पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील 7 दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत. जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील असा सज्जड दम सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
येत्या वर्षभरातच मुंबई उपनगरातील घरांच्या किमती किमान 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. TDR मध्ये दुपटीनं वाढ झाल्यानं घरांच्या किमतींत वाढ होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
पीएम मोदी यांची कल्याणला सभा असल्याने रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनास ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आलं होतं.
कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी उमेदवारांकडून नोकरीचा अर्ज मागवण्यात येत आहे. नेमकी कोणती आणि किती पदे रिक्त आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासंदर्भातील अधिकची माहिती खालील बातमीमधून जाणून घ्यावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत आज रोड शो झाला. घाटकोपर परिसरातून या रोड शो पार पडला. घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल समोरून रोड शोला सुरुवात झाली होती, तर पार्श्वनाथ मंदिर परिसरात रोड शोचा समारोप झाला.
नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार आहे. नकली शिवसेना विलिन झाली की मला बाळासाहेबांची सर्वात जास्त आठवण येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले.
CAA लागू केल्यानंतर केंद्र सरकारने पहिल्यांदाच 14 लोकांना त्याचे फायदे दिले आहेत. गृह मंत्रालयाने याची पुष्टी केली आहे, बुधवारी केंद्रीय गृह सचिवांनी 14 लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील सेरामपूर येथील रॅलीत (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील शांततापूर्ण परिस्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून प्रकाश कापडे असे या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.