कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपा स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते, असे वक्तव्य राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे.
नागपूरकरांची तहान भागावणाऱ्या धारणांसह इतर सर्व धारणांमध्येही पुरेसा पाणीसाठा असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बिहारच्या सीतामढी येथे माता सीतेचे भव्य मंदिर उभारलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.
तोशिबा पुनर्रचना मोहिमेचा भाग म्हणून 4 हजार नोकऱ्या कमी करणार असल्याची माहिती समोर आली. खाजगी इक्विटी फर्म जपान इंडस्ट्रियल पार्टनर्स (JIP) च्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने $13 अब्ज टेकओव्हर केल्याने डिसेंबरमध्ये तोशिबाच्या डिलिस्टिंगनंतर बदल झाला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाठवलेल्या एका धक्कादायक टिप्पणीमध्ये, एका पाकिस्तानी मौलवीने झाकीर नाईक हा भारताचा फरारी आणि इस्लामिक टेलि-इव्हेंजलिस्ट याला भारताचा सम्राट घोषित करण्याची वकिली केली आहे.
शरद पवारांच्या सटाणामधील सभेत भाषण सुरू असताना बॅनर कोसळल्याची दुर्घटना घडली. सटाण्यात शरद पवार यांचे भाषण सुरू असताना वादळी वारे सुटले होते, या वाऱ्यामुळे सभेच्या व्यासपीठावरील बॅनर कोसळत होता.
सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली . या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.
न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने पीएमएलए अंतर्गत अटक करण्याच्या ईडीच्या अधिकारांवर आज निकाल दिला.