ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे, अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे.
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढऊतार पाहायला मिळत आहे. मात्र एकंदरीतच या चढउताराच्या काळात या दोन्ही धातूंची किंमत वधारल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक पातळीवर सोने, चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.
अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील नगरपंचायत समोरील रोडवर दोन पादचारी तरुणांना कारने उडवलय.
लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक, असल्याचं त्यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितलेय. त्याशिवाय चार जून रोजी आपण सर्वजण जल्लोष करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
छत्तीसगडमधील कवार्धा येथे झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात कर्नाटकचे जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना जामीन मंजूर झाला आहे. 42 व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी 66 वर्षीय राजकारण्याला अंतरिम दिलासा दिला होता.
जळगावात सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर दरोडा घातल्याचा प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने लुटून नेले असून यामुळे जळगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशीनला घातला. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.