महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनला जाहीर करण्यात आली होती. परंतु ती दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 27 मे ला जाहीर करणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली.
जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आतापर्यंत स्फोट दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन मराठी चॅनलला बोलताना दिली आहे.
या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत जाणून घ्या.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होऊ शकतो. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
एमआयडीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घटनेनंतर पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाईला सुरुवात झाली. कोरेगावमधील बड्या पब्जवर पालिकेने कारवाई केली असून संपूर्ण पुणे शहरातील पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाई करण्याची माहिती वसंत मोरेंनी केली.
भीमा नदी पात्रात बोट बुडाली या दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत.
परदेशात पाकिस्तानी नागरिक भारतीय नागरिकांचे खंडणीच्या मागणीसाठी अपहरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. खंडणीसाठी तुर्कस्तान आणि कंबोडियामध्ये अपहरण करणाऱ्या पाकिस्तानी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.