आगामी लोकसभेच्या तारखांची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. अशातच राजकीय पक्षांसाठी निवडणूकीआधी आदर्श आचार संहिता लागू केली जाते. पण आदर्श आचार संहिता म्हणजे काय? यासंबंधित नियम आणि कोण लागू करू शकतात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 17 वर्षीय मुलीने येडियुरप्पा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे.
भाजपच्या केंद्र सरकारने 11 मार्चला नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू केला. यासंबंधित अधिसूचना देखील जारी केली. यावरच आता अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.
मुंबईत शुक्रवारी पेट्रोलचे दर 104.21 रुपये प्रति लीटर झाले आहेत. गुरुवारी पेट्रोलचे दर 106.31 रुपये होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय होण्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवड निवडणूकीच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती लोकसभेतील काँग्रेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे सुरू करण्यात आली आहे. याबद्दल पाकिस्तानच्या नागरिकांना कळले असता ते हैराण झाले आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जेणेकरुन मतदान करण्यासाठी गेल्यानंतर तुमची गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना दिले. याबद्दल शरद पवारांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन जोरदार टीका केली आहे. अमित शाह यांनी सीएए मुस्लिम विरोधी नसल्याचे म्हटले आहे.