लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधी मध्य प्रदेशात भाजपला मोठा झटका बसला आहे. भाजपचे राज्यसभेतील खासदार अजय प्रताप सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना देखील दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांनी कलम 370 ते जीएसटीच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे.
दिल्लीतील मद्रास कॉफी हाऊसमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महिलेने रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेल्या डोसामध्ये चक्क एक नव्हे आठ झुरळं आढळून आली आहेत.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुंबईत आली आहे. यावेळी प्रियांका अँटेलियामध्ये एका कार्यक्रमासाठी पोहोचली असता तिच्या देसी लुकने सर्वांना भुरळ घातली आहे. अभिनेत्रीचा गुलाबी रंगातील साडीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
15 मार्चला बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या. यामुळे चाहत्यांनी बिग बी यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थनाही केल्या.
ज्योतिषशास्रानुसार, होळीच्या आठ दिवसांआधी होलाष्टक सुरू होते. खरंतर, होलाष्टकावेळी कोणतीही शुभ कार्य केली जात नाही. यंदा होलाष्टक कधी याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या आजारी असलेल्या मालकाला पाहण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे दिसून येत आहे.
येत्या 24 मार्चला रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी रंगांची उधळण करत सणाचा आनंद घेतला जातो. पण रंगपंचमीवेळी वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे त्वचेचे नुकसान होते. अशातच त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.
अमेरिकेतील न्यूजर्सी येथील शाळेतील एका विद्यार्थिनीचा आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करत डीपफेक फोटो तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. खरंतर हे प्रकरण गेल्या वर्षातील आहे.
केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. याशिवाय हे ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक देखील करण्यात आले आहेत.