लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नुकतीनच उमेदवारांची पाचवी यादी जारी केली आहे. या यादीमध्ये भाजपने नेत्यांसह कलाकारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय बंडखोर आमदारांपासून दूर राहण्याची भूमिका पाचव्या यादीत भाजपने घेतल्याचे दिसून आले.
होळीच्या सणाला हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे. या दिवशी द्वेष, मत्सर, लोभ अशा वाईट गोष्टी होळीच्या पवित्र अग्नीत जाळल्या जातात. होळीच्या सणाला काही उपाय केल्याने नकारात्मक उर्जा आणि वाईट नजरेपासून तुम्ही दूर राहू शकता.
होळीच्या सणावेळी एकमेकांना रंग लावून सणाची मजा लुटली जाते. अशातच होळीला राशीनुसार रंगांची निवड करणे शुभ मानले जाते.
भारतात वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे वाहन परवाना असणे आवश्यक आहे. वयाच्या 18 वर्षावरील व्यक्तींना वाहन परवाना दिला जातो. अशातच आता वाहन परवाना तयार करणे सोपे झाले आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
यंदा होळीचा सण 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. अशातच बॉलिवूडमधील कलाकारांमध्ये होळीची मोठी धूम पाहायला मिळते. पण यंदा काही सेलिब्रेटी पहिल्यांदाच लग्नानंतर होळी साजरी करणार आहेत.
रंगपंचमीच्या दिवशी रंगांची मुक्तपणे उधळण केली जाते. पण रंगपंचमीला वापरल्या जाणाऱ्या रंगांमुळे त्वचा, केस नव्हे फुफ्फुसांचे देखील नुकसान होऊ शकते. यंदाच्या रंगपंचमीला आरोग्याची कशी काळजी घ्याल याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
होळी सणाला हिंदू धर्मातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपारिक महत्त्व आहे. यंदा होळीचा सण येत्या 24 मार्चला साजरा केला जाणार आहे. देशभरात होळीच्या सणाची मोठी धूम पाहायला मिळते. याशिवाय होळीचा सण ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने आणि परंपरेने साजरा केला जातो.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी (21 मार्च) ईडीने केजरीवाल यांना दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात अटक केली आहे.
रशियाची राजधानी मॉस्को येथील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 60 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केले आहे.
पुण्यातील मावळ येथे एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.