Asianet News

asianet.news@asianetnews.in
    Asianet News is a trusted name in Indian journalism, known for delivering accurate, timely, and impactful news. With decades of experience, we excel in covering regional, national, and international stories, ensuring our readers stay informed about the topics that matter most.Whether through breaking news, investigative features, or nuanced opinion pieces, Asianet News remains your reliable source for comprehensive and credible content.Stay connected with Asianet News for stories that matter
    • Location:Delhi, in
    • All
    • 13 NEWS
    13 Stories by Asianet News

    Lok Sabha Election 2024 Third Phase Voting Updates : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बजावला मतदानाचा हक्क

    May 07 2024, 07:07 AM IST

    Third Phase Voting Live Updates : लोकसभा निवडणुकीसाठी आज (7 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 94 संसदेच्या जागांवर 7 मे ला मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, प्रल्हाद जोशी, सुप्रीया सुळेंसह अन्य बडे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. यावेळी बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालासारख्या काही प्रमुख राज्यांमध्ये मतदान होणार आहे.

    Lok Sabha Election 2024 Second Phase Voting Updates : महाराष्ट्रात सर्वाधिक कमी 41 टक्के तर मणिपूर येथे सर्वाधिक 68.92 टक्के मतदान

    Apr 26 2024, 07:05 AM IST

    Secound Phase Voting : लोकसभा निवडणुकीसाठी आज (26 एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 13 राज्यांसह 89 मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम, बिहार. छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, त्रिपुरासह मणिपुरमधील एक भाग मणिपुरच्या बाहेरील जागेचा समावेश आहे.  दरम्यान, वर्ष 2019 मध्ये याच 88 जागांपैकी 52 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. याशिवाय काँग्रेसला 18 आणि शिवसेना व जेडीयूला चार-चार जागांवर विजय मिळवता आला होता. या व्यतिरिक्त 10 जागा अन्य खात्यात केल्या होत्या.

    Lok Sabha Election 2024 First Phase Voting Updates : पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण, मणिपूरमध्ये गोळीबार तर छिंदवाडा येथे दोन गटात हाणामारी

    Apr 19 2024, 07:01 AM IST

    First Phase Voting Live Voting : लोकसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील 102 मतदारासंघासाठी मतदान केले जात आहे. याशिवाय महाराष्ट्रातील पाच लोकसभेच्या मतदारसंघात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात जम्मू आणि काश्मीरमधील जितेंद्र सिंह, महाराष्ट्रातील नागपूर येथील नितीन गडकरी, उत्तर प्रदेशातील जतीन प्रसाद, तमिळनाडूतील ए राजा डीएमके, तमिळनाडूतील के अन्नामलाई, अरुणाचल प्रदेशातील किरेन रिजिजू, जोरहाट-आसाममधील गौरव गोगई आणि मध्य प्रदेशातील नकुल नाथ अशा बड्या नेत्यांसाठी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असणार आहे.

     

    Top Stories