महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे हे सर्वांनाच परिचयाचे आहेत.ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे. अशातच गोव्यातील साऊथ मधून उभ्या असलेल्या पल्लवी डेम्पो यांनी संपत्ती जाहीर केली आहे.
भारतातील लोकप्रिय युट्युबर अभ्रदीप साहा याचे वयाच्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याला अँग्री रँटमॅन म्हणूनही देखील ओळखले जात होते. गेल्या महिन्यात त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली होती, त्यानंतर त्याचे आज निधन झाले आहे.
नुकताच वाराणसी येथे मनीष मल्होत्रा आयोजित एक फॅशन शो पार पडला. वाराणसीतील नमो घाटावर या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने क्रिती सेनॉन आणि रणवीर सिंह एकत्र दिसून आले. या शोचे फोटो क्रितीने नुकतेच सोशल मीडियावर टाकले आहेत.
गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरगंधर्व सुधीर फडके ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला.
सध्याच्या काळात प्रत्येकजण बहुतांश आर्थिक व्यवहार डिजीटल करतो. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये Paytm,Googlepay आणि Phonepe सारखे अॅप अगदी सामान्य झालेत.पण स्मार्टफोन चोरीला गेल्यास? माणूस भांबावून जातो. काय करायचं समजत नाही. यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सिव्हिल सर्व्हीसेस म्हणजेच IAS,IPS,IFS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होतात,त्यासाठी किती वेळ लागतो याबाबद्दल जाणून घ्या. कालच सिव्हिल सर्व्हीस २०२३ परीक्षेचा निकाल लागला आहे.
छत्तीसगडमधील माओवादग्रस्त भाग कांकेरमध्ये पोलिसांनी चकमकीत 29 माओवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. या चकमकीत संरक्षण दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
महिलांमध्ये थकवा येणे, हिमोग्लोबिनची कमतरता, मासिक पाळीचे चक्र बिघडणे, अंगदुखी अशा एक ना अनेक तक्रारी सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या समस्या उद्भवू नयेत यासाठी भारतीय योगामध्ये काही खास आसने आहेत.जाणून घ्या सविस्तर
अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. तसेच त्यांचे फॉलोवर देखील तेवढ्याच प्रमाणात आहेत. त्यामुळे अनेक कंपन्या पेड प्रमोशनसाठी त्यांना पोस्ट शेअर करायला सांगता, जाणून घ्या एक पोस्ट शेअर करण्यासाठी सेलिब्रिटी किती पैसे आकारतात.