पत्नी-मुलं ते आई-वडिलांना EPFO च्या माध्यमातून मिळतात या 7 पेन्शन सुविधा, असा घ्या लाभ

EPFO Pension Schemes : EPS-1995 च्या अंतर्गत सात प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात. पण पेन्शनसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Chanda Mandavkar | Published : May 23, 2024 7:13 AM IST / Updated: May 23 2024, 12:48 PM IST

EPFO Pension Schemes : कर्मचारी भविष्य निधी संगठना (EPFO) आपल्या ग्राहकांना पेन्शनची सुविधा देते. यामुळे सेवानिवृत्तीनंतर ग्राहकांना आर्थिक मदत मिळू शकते. अशातच ईपीएफओकडून EPS-1995 नावाने एक पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून ग्राहकांना काही लाभ घेता येतात. याशिवाय ईपीएफओमधील सुविधांच्या माध्यमातून दीर्घकाळापर्यंत रेग्युलर इन्कमसाठी क्लेम केले जाऊ शकते. खरंतर, EPS-1995 अंतर्गत सात प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात. यासाठी क्लेम करण्याचे नियम आणि अटी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...

सुपर एनुवेशन किंवा वृद्धावस्था पेन्शन
सुपर एनुवेशन किंवा वृद्धावस्था पेन्शनची सुविधा 10 वर्षांची सदस्यता आणि 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळते. खरंतर, सेवानिवृत्ती झालेल्या व्यक्तीला त्यानंतरही पेन्शन मिळू शकते.

माजी पेन्शन
एखाद्याने 10 वर्षांची सदस्या पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलल्यास आणि अशा ठिकाणी कामावर रुजू झाल्यास जेथे ईपीएफ अधिनियम लागू नाही त्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माजी पेन्शनचा लाभ घेता येईल. अथवा वर्ष 58 वर्षांच्यानंतर पेन्शन घेऊ शकतात. माजी पेन्शन अंतर्गत वयाची 58 वर्ष पूर्ण होण्यासाठी जेवढी वर्ष कमी असतील त्याच्या प्रत्येक वर्षाला चार टक्के दर कमी करत 9600 रुपये पेन्शन दिली जाईल. अशाप्रकारे 56 वर्षांच्या वयात हिच पेन्शन 9216 रुपये पेन्शन मिळते.

विकलांगता पेन्शन
एखाद्या व्यक्तीने विकलांगताच्या कारणास्तव नोकरी सोडल्यास त्याला विकलांगता पेन्शन दिली जाते. यासाठी वयाची मर्यादा नाही.

पत्नी आणि दोन मुलांसाठी पेन्शन
सदस्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीसह दोन मुलांना पेन्शन दिली जाते. जर दोन पेक्षा अधिक मुल असल्यास आणि त्यांचे वय 25 वर्षे होण्यापर्यंत दोन मुलांना पेन्शन मिळते. ज्यावेळी मोठ्या मुलाचे वय 25 वर्ष होते तेव्हा त्याची पेन्शन थांबली जाते. तिसऱ्या मुलाची पेन्शन सुरू होते. हाच क्रम पुढे सुरू राहतो, जो पर्यंत मुल 25 वर्षांचे होत नाही. यासाठी सभासदाचे एक महिन्याचे योगदानही पुरेसे आहे. जर एखादे मुलं विकलांग असल्यास त्याला आयुष्यभरासाठी पेन्शन दिली जाते.

अनाथ पेन्शन
EPS-1995 अंतर्गत एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास आणि पत्नीचे देखील निधन झाले असल्यास त्यांच्या दोन मुलांना वयाच्या 25 व्या वर्षांपर्यंत पेन्शन दिली जाते.

नॉमिनेशन पेन्शन
नॉमिनेशन पेन्शन व्यक्तीने ज्या व्यक्तीला नॉमिनी ठेवले आहे त्याला दिली जाते. नॉमिनिला पेन्शन सदस्याच्या मृत्यूनंतर दिली जाते.

आई-वडिलांसाठी पेन्शन
सदस्य अविवाहित असून त्याचा मृत्यू झाल्यास आणि त्याने कोणाचेही नाव नॉमिनी म्हणून ठेवले नसल्यास पेन्शन वडिलांना मिळते. पण वडिलही नसल्यास आईच्या नावे पेन्शन सुरू राहते. दरम्यान, या पेन्शनसाठी लाभार्थ्याला ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अथवा ईपीएस अंतर्गत पेन्शन घेण्यासाठी 10D फॉर्म भरावा लागतो.

आणखी वाचा : 

तुम्हाला Income Tax ची आलीय? अशी तपासून पाहा खरी की खोटी

पहिल्यांदाच केलेल्या कमाईतून Investment Plan करण्यासाठी 8 खास टिप्स

 

Share this article