आयुष्यातील पहिली नोकरी आणि पहिला पगार कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील फार मोठा आनंदाचा क्षण असतो. यासोबत काही जबाबदाऱ्यारी मागे लागतात.
जेवढ्या लवकर बचत सुरू कराल तेवढ्याच लवकर गुंतवणूकीचा अधिक फायदा घेता येईल.
सर्वप्रथम पगारातील पैशांचे एक बजेट तयार करा. यानुसार कोणत्या गोष्टींसाठी किती पैसे खर्च करायचे याचा विचार करा. याशिवाय विनाकारण होणारे खर्च टाळा.
गुंतवणूकीमधील सर्वाधिक महत्त्वाचा नियम म्हणजे आर्थिक लक्ष्य ठरवणे. जसे की, एखादे नवे घर, गाडी अथवा कोणतीही गोष्ट खरेदी करायची असल्यास त्या दृष्टीने तुमचे आर्थिक लक्ष्य ठरवा.
तरुणांनी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. यासाठी म्युचअल फंड्सच्या SIP चा पर्याय निवडू शकता.
केवळ बजेट आणि गुंतवणूक प्लॅन करून काहीही फायदा नाही. तुम्ही आर्थिक प्लॅनिंगसह टॅक्स प्लॅनिंगही करावी.
वीमा काढण्याचा उद्देश आर्थिक सुरक्षा आहे. यामुळे तुमच्यासह परिवारातील सदस्यांना आर्थिक सुरक्षा मिळते.
नोकरी लागल्यानंतर लगेचच आर्थिक प्लॅनिंग सुरू करा. यामुळे हळूहळू मोठी बचत होण्यास मदत होईल.