तुम्ही सोया मिल्क, बदाम मिल्क, ओट्स मिल्क मध्येही कॅल्शियम असते. तुम्हाला दुध पचत नसल्यास तुम्ही या पर्यायांची निवड करू शकता. तसेच संत्र्याचा रस, सुके अंजीर, मसूर आणि सोयाबीनचे सेवन देखील फायदेशीर ठरते.
कॅल्शियमच्या कमतरतेचे तोटे
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, ऑस्टियोपोरोसिसचा धोका सर्वाधिक असतो, ज्यामध्ये हाडे खूप कमकुवत होतात व थोड्या धक्क्याने देखील हाड फ्रॅक्चर होण्याची भीती असते. हा आजार सर्वाधिक प्रमाणात महिलांमध्ये दिसून येतो. म्हणूनच महिलांनी कॅल्शियमच्या कमतरतेकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे.
आणखी वाचा -
Winter Special Hair Oil : लांबसडक, घनदाट व काळेभोर केस हवे आहेत? वापरा हे नैसर्गिक तेल VIDEO
Hair Care : या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे गळताहेत तुमचे केस, टक्कल पडण्यापूर्वीच व्हा सावध
नाश्तामध्ये खा हे 7 प्रकारचे हेल्दी चीला