Wheat Momos Recipe : मुलांना मोमोज खायला आवडतात? घरच्याघरी बनवा गव्हाच्या पीठाची ही पौष्टिक रेसिपी

Published : Jan 05, 2024, 07:04 PM ISTUpdated : Jan 05, 2024, 07:08 PM IST
Wheat Momos Recipe

सार

लहान मुलांना फास्ट-फूड खायला खूप आवडते. परंतु अत्याधिक प्रमाणात फास्ट फूड खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. मुलांना मोमोज खायला आवडत असल्यास घरच्याघरी हेल्दी मोमोज तयार करू शकता. जाणून घेऊया गव्हाच्या पीठाचे मोमोज तयार करण्याची रेसिपी…

Wheat Momos Recipe : बहुतांशजणांना मोमोज खायला आवडतात. मोमोजचे वेगवेगळे प्रकारही तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळतील. पण तुमच्या मुलांना मोमोज खायला  फार आवडतात का? घरच्याघरी तुम्ही देखील पौष्टिक आणि हेल्दी मोमोज तयार करू शकता. जाणून घेऊया या रेसिपीसाठी लागणारी सामग्री आणि कृती सविस्तर....

सामग्री

  • एक वाटी गव्हाचे पीठ
  • एक ढोबळी मिरची
  • एक गाजर
  • अर्धा बारीक चिरलेला कोबी
  • अर्धा चमचा आलं
  • अर्धा चमचा लसूण
  • अर्धा वाटी पनीर
  • दोन चमचे सोया सॉस
  • दोन चमचे रेड चिली सॉस
  • एक टिस्पून काळी मिरी पावडर
  • तेल
  • पाणी
  • मीठ चवीनुसार

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन ते घट्ट मळून घ्या. यावेळी गरजेनुसार पाणी आणि मीठ मिक्स करा.
  • आता घट्ट गव्हाच्या पीठात तेल मिक्स करून पुन्हा पीठ व्यवस्थितीत मळून घ्या. मळून घेतलेले पीठ 15-20 मिनिटे झाकून ठेवा.
  • मोमोजच्या स्टफिंगसाठी एका भांड्यात ढोबळी मिरची, गाजर, कोबी, आलं, पनीर, सोया सॉस, रेड चिली सॉस, काळी मिरी पाडवर एकत्रित मिक्स करा.
  • गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आलं आणि लसूण मिक्स करत मोमोजसाठी तयार करण्यात आलेले स्टफिंग हलके भाजून घ्या.
  • मोमोजचे स्टफिंग भाजतानाच त्यामध्ये सोया सॉस, मीठ टाका. कढईवर झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे स्टफिंग भाजण्यासाठी ठेवा.
  • स्टफिंग भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊन ते थोडं थंड होऊ द्या.
  • घट्ट मळलेले गव्हाचे पीठ घेऊन त्याचे लहान आकारातील गोळे तयार करा. पीठाचे गोळे लहान आकारातच लाटून घ्या. यानंतर लाटलेल्या पीठाच्या गोळ्यामध्ये चमच्याने स्टफिंग भरून हाताने पीठाला मोमोजसारखा आकार द्या.
  • गॅसवर स्टिमरमध्ये पाणी गरम करत ठेवा. आता गव्हाच्या पीठाचे मोमोज शिजण्यासाठी स्टिमरवर झाकण ठेवा. मोमोज सात ते आठ मिनिटांसाठी शिजवा. यानंतर एका प्लेटमध्ये काढून शेजवान चटणीसोबत मुलांना खायला द्या.

आणखी वाचा : 

Orange Chicken Recipe : आंबट-तिखट चव असणाऱ्या ऑरेंज चिकनची रेसिपी, वाचा स्टेप बाय स्टेप

Makar Sankranti Special Recipe : यंदाच्या मकर संक्रातीला बनवा खास तिळाची बर्फी

Moong Dal Dosa : मुलांना नाश्तासाठी बनवा चविष्ट असा मूग डाळीचा डोसा

PREV

Recommended Stories

Horoscope 9 December : आज मंगळवारचे राशिभविष्य, या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल!
फक्त ७ डिझाईन्स! जडाऊ गोल्ड प्लेटेड इअरिंग्ज जे प्रत्येक लुकला देतील रॉयल टच; तुम्हीही लगेच ट्राय करा!