केळी हे स्वस्त आणि पौष्टिक फळ ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी केळी फायदेशीर आहे. केळ्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला आवश्यक पोषण देतात.
केळी हा सर्वांत स्वस्त आणि पौष्टिक फळांपैकी एक मानला जातो. दिवसभरातील ऊर्जेचा उत्तम स्रोत असलेल्या केळीत अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज केळी खाल्ल्यास पचनतंत्र सुधारते, हृदयाचे आरोग्य टिकून राहते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते.
केळी खाल्याचे प्रमुख फायदे
त्वरीत ऊर्जा मिळते
केळीत नैसर्गिक शुगर (ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोस) असते, जी शरीराला झटपट ऊर्जा देते.
व्यायामानंतर किंवा दिवसभरातील थकवा घालवण्यासाठी केळी उपयुक्त.
मेंदू आणि मानसिक आरोग्यास मदत
केळीत असलेले ट्रायप्टोफॅन (Tryptophan) नैसर्गिकरित्या स्ट्रेस कमी करण्यास मदत करते.
डोके शांत राहते आणि झोप चांगली लागते.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम
केळीत भरपूर पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते.
हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हाडे आणि स्नायू मजबूत होतात
केळीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडांसाठी फायदेशीर आहे.
स्नायूंची ताकद वाढते आणि उष्णतेमध्ये क्रॅम्प्स टाळता येतात.
पचनतंत्र सुधारते
फायबरयुक्त असल्याने गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करते.
शरीरातील चयापचय क्रिया सुधारते.
कोणत्या वेळी केळी खाल्ले पाहिजे?
सकाळी न्याहारीसोबत किंवा व्यायामानंतर खाणे फायदेशीर.
रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास ऍसिडिटी होऊ शकते, त्यामुळे दुधासोबत किंवा इतर पदार्थांसोबत खावे.