Mahashivratri 2025 : घरच्याघरी भगवान शंकराचा अभिषेक कसा करावा?
Lifestyle Feb 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
महाशिवरात्री 2025
महाशिवरात्रीचे मोठ्या उत्साहाने संपूर्ण देशात साजरी केली जाते. याशिवाय वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही असते. महाशिवरात्रीवेळी भगवान शंकराची पूजा केली जाते.
Image credits: adobe stock
Marathi
भगवान शंकराचा अभिषेक कसा करावा?
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. यामुळे महाशिवरात्रीवेळी पूजा आणि अभिषेकाबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Getty
Marathi
अभिषेकसाठी आवश्यक सामग्री
अभिषेक करण्यासाठी शुद्ध जल, दूध, दही, मध, गंगाजल, बेलपत्र, चंदन, धूप, दीवा आणि फळं घ्या.
Image credits: Getty
Marathi
सकारात्मक उर्जेचा वास
भगवान शंकराला दूध, दही आणि पवित्र जल अर्पण केल्याने आयुष्यात आणि घरात सकारात्मक उर्जा येतात. दूध आणि दह्यामुळे शांती, शुद्धता येते.
Image credits: Getty
Marathi
महाशिवरात्री पूजा विधी
सर्वप्रथम पहाटे लवकर उठून स्नान करा. व्रताचा संकल्प करा आणि नंतर घरातील देव्हाऱ्यात पूजेची तयारी करा. याशिवाय आवश्यक सामग्री एकत्रित करा.
Image credits: Getty
Marathi
भगवान शंकराचा अभिषेक
शंकराची पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. यावेळी शंकराच्या 108 मंत्रांचा जाप करू शकता. यानंतर शंकराचा अभिषेक करा.
Image credits: Getty
Marathi
शंकराची परिक्रमा करू नका
अभिषेक केल्यानंतर शंकराला फुल अर्पण करा. यानंतर आरती केल्यानंतर शंकराची परिक्रमा करू नका.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.