Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
लवंगाचे फायदे
लवंगामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. यामुळे शरीराला मजबूती मिळण्यासह पचनक्रिया सुधारली जाते.
Image credits: Freepik
Marathi
आयुर्वेदानुसार
आयुर्वेदानुसार, उपाशी पोटी लवंग खाल्ल्याने सर्दी-खोकला व दातांसंबंधित समस्या दूर होतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल व अँटी-व्हायरल गुण असल्याने संक्रमणाच्या विरोधात लढण्यास मदत करतात.
Image credits: Freepik
Marathi
लवंगचे नुकसान
कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करणे नुकसानदायक ठरू शकते. यामुळे उपाशी पोटी गरजेपेक्षा अधिक लवंगाचे सेवन करणे पोटात जळजळ, अॅसिडिटीसारख्या समस्या होऊ शकतात.
Image credits: social media
Marathi
मर्यादित प्रमाणात सेवन करा
अत्यधिक प्रमाणात लवंगाचे सेवन केल्यास अॅलर्जीसारख्या समस्या होऊ शकतात. यामुळे उलटी, त्वचेवर चट्टे येणे आणि खाज अशा समस्या उद्भवू शकतात.
Image credits: social media
Marathi
यकृतासंबंधित समस्या
लवंगाचे अधिक सेवन केल्याने यकृतासंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे यकृताला सूज येण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
Image credits: social media
Marathi
लवंग खाण्यापासून दूर रहा
रक्त पातळ होण्यासाठी लवंगाची भूमिका असते. यामुळे ज्या व्यक्ती आधीपासून ब्लड थिनर औषधे घेत असल्यास त्यांनी उपाशी पोटी लवंगाचे सेवन करणे टाळावे.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.