Heart Attack : खरंच या वेळेस जेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो? जाणून घ्या रीसर्चमधील माहिती

Published : Dec 21, 2023, 07:19 PM ISTUpdated : Dec 21, 2023, 07:27 PM IST
Health tips why men should take care of his heart health before 50 years age dva

सार

Heart Attack Causes : हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे खराब लाइफस्टाइल व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. या समस्येपासून स्वतःचा बचाव करायचा आहे? मग जाणून घ्या रीसर्चमधील माहिती…

Heart Attack Causes : धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे आपल्यापैकी बहुतांश जणांना वेळेत खाणेपिणे शक्य होत नाही तसेच व्यायाम करण्यासाठीही वेळ मिळत नाहीत. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. पण या समस्येपासून तुम्हाला स्वतःचा बचाव करायचाय का?

हो असे म्हणताय. तर यासाठी तुम्हाला आपल्या जेवणाची योग्य व निश्चित वेळ ठरवणे आवश्यक आहे. जेवणाच्या वेळेची काळजी घेतली तर हृदयविकारांचा धोका टाळणे शक्य आहे. जेवणाची वेळ आणि हृदयविकाराचा धोका यामध्ये संबंध असल्याची माहिती अलिकडील संशोधनाद्वारे समोर आली आहे.

नेचर कम्युनिकेशन जर्नलमध्ये (Nature Communications Journal) प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, योग्य वेळेत जेवण केल्यास हृदय व रक्तवाहिन्याशी संबंधित (Cardiovascular) आजारांचा धोका कमी होतो. 

या अभ्यासामध्ये संशोधकांनी जवळपास 42 वय असणाऱ्या तब्बल 1 लाख 03 हजार 389 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे जेवणाच्या वेळा व हृदयविकार यांचा संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. संशोधनामध्ये सूचवण्यात आलेल्या जेवणाच्या वेळा या आपल्या वेद-पुराणांमध्ये फार पूर्वीच सांगण्यात आलेल्या आहेत.

संशोधनातील माहिती

अभ्यासातील माहितीनुसार, जर आपण सकाळचा नाश्ता सकाळी 8 वाजण्यापूर्वी किंवा 9 वाजेनंतर केला तर हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. तसेच दुसरीकडे आपण रात्रीचे जेवण 8 वाजेपूर्वी करण्याऐवजी 9 वाजता केले तरीही हृदयविकारांचा धोका वाढू शकतो. ही समस्या विशेषतः महिलांमध्ये आढळून आली. म्हणूनचे रात्रीचे जेवण 8 वाजेपूर्वी करणे आरोग्यासाठी चांगले असते.

संध्याकाळी लवकर जेवल्याने रात्रीच्या वेळेस अधिक काळ उपवास होण्यास वेळ मिळतो. तसेच सकाळचा नाश्ता न करण्याऐवजी नाश्ता करण्याची सवय हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित विकारांवर आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी असल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे.

सकाळी 8 ते रात्री 9 वाजेदरम्यान जेवणाचे वेळापत्रक पाळल्यास आरोग्यावर कसे परिणाम होतात? जाणून घेऊया सविस्तर…

  • ब्रेकफास्ट न केल्यास हृदयविकारांचा धोका वाढतो.
  • जेवणासाठी ठरवण्यात आलेल्या वेळेनुसार तासभर उशिराने जेवण केल्यास सेरेब्रोव्हॅस्क्युलर रोगाचा (Cerebrovascular Disease Causes) धोका सहा टक्क्यांनी वाढतो.
  • रात्री 9 वाजेनंतर रात्रीचे जेवण केल्यास सेरेब्रोव्हॅस्क्युलर रोगाचा (Cerebrovascular Disease Symptoms) धोका 28 टक्क्यांनी वाढतो.
  • आपण दिवसातून किती वेळा खाद्यपदार्थांचे सेवन करत आहात, याने आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही.
  • रात्रीचे जेवण आपण 8 वाजेपूर्वी केल्यास सेरेब्रोव्हॅस्क्युलर रोगाचा (Cerebrovascular Disease Medication) धोका सात टक्क्याने कमी होतो.

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

Belly Fat Loss : सुटलेले पोट कमी करायचंय? केवळ या एका आसनाचा करा सराव

Weight Loss : या मॉडेलचं 234kg होते वजन, जाणून घ्या 'फॅट टू फिट' जर्नी

Mock Chicken Tikka : विराट कोहलीने मॉक चिकन टिक्कावर मारला ताव, जाणून घ्या रेसिपी

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स