दररोज ब्रश केल्यानंतरही तोंडातून दुर्गंधी येते? असू शकतात ही कारणे

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे चारचौघात बोलताना लाज वाटते बहुतांशजणांना वाटते की, ब्रश योग्य पद्धतीने न केल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येतेय. यामागे काही कारणे देखील असू शकतात.

Oral Health Care : एखाद्याशी बोलताना तोंडातून दुर्गंधी येत असल्यास लाज वाटते. यामागील मोठे कारण म्हणजे ब्रश न करणे, तोंडाची स्वच्छता न ठेवणे असे मानले जाते. पण या व्यतिरिक्तही तोंडासंबंधित काही समस्या असू शकतात ज्यामुळे तोंडातून दुर्गंधी येते. या समस्यांकडे वेळीच लक्ष न दिल्यास तोंडातून दुर्गंधी येण्यासह दातांचे नुकसान होऊ शकते.

तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी माउथ फ्रेशनर ते घरगुती उपाय केले जातात. जसे की, वेलची, बडीशेपचे सेवन केले जाते. पण तरीही तोंडातून दुर्गंधी येते. यामागे काय कारणे असू शकतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

पाणी कमी पिण्याची सवय

दिवसभरातून कमी पाणी पिण्याची सवय असल्यास तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या होऊ शकते. खरंतर, डिहाइड्रेशन झाल्यानंतर तोंड सुकते. यामुळे तोंडात लाळ फार कमी जमा होते आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. अशातच तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.

पोट स्वच्छ नसणे

ज्या व्यक्तींचे पोट स्वच्छ नसते किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास तोंडातून दुर्गंधी येते. याशिवाय फुफ्फुसांसंदर्भात समस्येवेळीही तोंडातून दुर्गंधी येऊ शकते.

अत्याधिक कॅफेनचे सेवन करणे

अत्याधिक कॅफन म्हणजे कॉफी, चहाचे सेवन केल्यानेही तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. खरंतर, कॅफेनयुक्त पेयांमध्ये गोडवा आणि दूध असल्याने कॅव्हिटी होऊ शकते. कॅफेनमुळे तोंडातील लाळ सुकली जाते आणि बॅक्टेरिया तयार होतात. अशातच तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होऊ शकते.

झोपेत घोरणे

झोपेत घोरण्याची सवय असल्यास तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. या स्थितीत व्यक्ती नाकाएवजी तोंडातून श्वास घेत असल्याने लाळ सुकली जाते. याच कारणास्तव तोंडातून दुर्गंधी येते.

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होऊ शकते समस्या

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये इंन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया प्रभावित होत असल्याने त्यांच्या तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. याशिवाय औषधांचे सेवन केल्यानेही कधीकधी तोंडाला दुर्गंधी येते.

आणखी वाचा : 

ओव्हरइटिंगची सवय मोडा, अन्यथा या 5 आजारांना पडाल बळी

2025 मध्ये संपूर्ण वर्षभर रहाल हेल्दी, आजपासूनच फॉलो करा या 6 सवयी

Share this article