धावपळीच्या आयुष्यात आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे आरोग्य बिघडले जाते. यामुळे आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवल्या जातात. हेल्दी राहण्यासाठी पुढील काही सवयी फॉलो केल्या पाहिजेत.
नव्या वर्षात हेल्दी राहण्यासाठी आजपासूनच तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी योगाभ्यास,मेडिटेशन करा. यामुळे मनं हलके होण्यासह डिप्रेशनसारख्या स्थितीपासून दूर रहाल.
फिट आणि हेल्दी राहण्यासाठी भाज्या आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा. यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल आणि शरिराला उर्जाही मिळेल.
फिट राहण्यासाठी आठवड्याभरात 150 मिनिटे फिजिकल अॅक्टिव्हिटी नक्की करा. यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते.
बहुतांशजण दिवसभरातून फार कमी पाणी पितात. हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासह हाइड्रेट राहण्यास मदत होते.
नव्या वर्षात फिट आणि हेल्टी राहण्यासाठी झोपेला प्राथमिकता द्या. दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या. यामुळे विचार करण्याची क्षमता सुधारण्यासह कामावर लक्ष केंद्रित करता येते.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच हेल्दी राहण्याचा संकल्प केला असल्यास स्मोकिंग आणि अल्कोहोलपासून दूर रहा. यामुळे हृदय आणि फुफ्फुसांसंदर्भात गंभीर आजार उद्भवू शकतात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.