बहुतांशजण चमचमीत आणि चविष्ट पदार्थ खाण्याच्या नादात ओव्हरइंटिंग करतात. यामुळे आरोग्यावर परिणाम होत काही आजार मागे लागतात.
प्रोसेस्ड फूड, तेलकट पदार्थ किंवा अत्याधिक मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असेल तर आजच थांबा. यामुळे कॅन्सर ते लठ्ठपणा अशा काही समस्या उद्भवू शकतात. याबद्दलच पुढे जाणून घेऊया...
ओव्हरइटिंगच्या सवयीमुळे लठ्ठपणा अधिक वाढला जातो. यामुळे पचनक्रिया मंदावली जाते आणि शरिरात अत्याधिक प्रमाणात फॅट्स तयार होऊ लगातात.
ओव्हरइटिंगच्या समस्येमुळे काहीजणांमध्ये प्री-मॅच्युअर एजिंगची समस्या दिसू लागते.
ओव्हरइटिंग केल्याने टाइप-2 मधुमेहाचा धोका उद्भवला जाऊ शकतो. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनीही अतिप्रमाणात फूड्सचे सेवन करणे टाळावे.
सातत्याने अत्याधिक प्रमाणात खाण्याची सवय असेल तर मेटाबॉलिज्म स्लो होतो. यामुळे हृदयासह कॅन्सरचा धोका उद्भवला जाऊ शकतो.
मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात फूड्सचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पोटात गॅस होणे अशा समस्या उद्भवल्या जातात.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.