राम मंदिर उभारणीत वापरलेल्या प्रत्येक दगडाचे 5 प्रकारे करण्यात आले परीक्षण, वाचा सविस्तर
Ayodhya Ram Temple : अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे. पण मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या प्रत्येक दगडाचे कशा पद्धतीने परीक्षण करण्यात आले, माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर…
Harshada Shirsekar | Published : Jan 5, 2024 11:57 AM / Updated: Jan 12 2024, 01:28 PM IST
अयोध्येतील भव्य राम मंदिर
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे 22 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील.
प्रत्येक दगडाचे करण्यात आले 5 पद्धतीने परीक्षण
श्री राम मंदिराच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या प्रत्येक दगडाचे पाच वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षण करण्यात आले.
ट्रीटमेंट आणि व्हेरिफिकेशन
मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या दगडांचे काही टप्प्यांमध्ये परीक्षण करण्यात आले. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडांचा वापर करण्यापूर्वी ट्रीटमेंट आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया करण्यात आली.
बंगळुरूमधील NIRMच्या शास्त्रज्ञांनी केले टेस्टिंग
मंदिराच्या बांधकाम प्रक्रियेत वापरण्यात आलेल्या दगडांचे टेस्टिंग नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रॉक मॅकेनिक्स (NIRM)मधील शास्त्रज्ञांनी केले. प्रत्येक दगडाचे परीक्षण केल्यानंतर त्यावर स्टॅम्प लावण्यात आला.
प्रयोगशाळेतही करण्यात आले परीक्षण
नृपेंद्र मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर उभारणीसाठी वापरलेल्या दगडांची चाचणी केल्यानंतर दगडांच्या काही तुकड्यांवर प्रयोगशाळेतही परीक्षण करण्यात आले.
पाच चाचण्यानंतर दगडांचा करण्यात आला वापर
राम मंदिराच्या बांधकामामध्ये वापरण्यात येणाऱ्या दगडांचे सर्वप्रथम व्हिज्युअल टेस्टिंग करण्यात आले. यानंतर प्राकृतिक टेस्ट, साऊंड टेस्ट, वॉटर टेस्ट आणि सर्वात शेवटी लॅब टेस्टिंग करण्यात आले.