Aditya-L1 Mission : इस्रोच्या आदित्य L-1 मिशनचे मोठे यश, सूर्याचे टिपले अप्रतिम PHOTOS

ISRO Mission: इस्रोच्या आदित्य एल-1 मिशनला मोठे यश मिळाले आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यात आलेल्या सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने सूर्याचे फोटो टिपले आहेत.

Chanda Mandavkar | Published : Dec 9, 2023 8:48 AM IST / Updated: Dec 09 2023, 03:08 PM IST

Aditya L-1 Mission: इस्रोचे (Indian Space Research Organisation) मिशन आदित्य एल-1 ला मोठे यश मिळाले आहे. सूर्याच्या वायुमंडळाचा (Sun Atmosphere) विस्तार पाहण्यासाठी 11 वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करण्यात आला. याद्वारे सूर्याचे अप्रतिम फोटो टिपण्यात आले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून सूर्यावरील ब्लॅकस्पॉट, सनस्पॉट अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत.

आदित्य एल-1 ने सूर्याचे फोटो आपल्या सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) च्या माध्यमातून टिपले आहेत. या टेलिस्कोपने अल्ट्राव्हायोलेट वेवलेंथवर (Ultraviolet Wavelength) सूर्याचा पूर्ण फोटो काढला आहे. शुक्रवारी (8 डिसेंबर, 2023) इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर फोटो शेअर करत याची घोषणा केली आहे.

आदित्य एल-1 ने 200 ते 400 नॅनोमीटरपर्यंतच्या वेवलेंथचा वापर करून फोटो टिपले आहेत. यामुळे सूर्याच्या प्रकाशमंडळ आणि क्रोमोस्फियर (Chromosphere) बद्दल नवी माहिती मिळेल. वेगवेगळ्या सोलार घटना समजून घेण्यासाठी हे स्तर महत्त्वाचे आहेत. यामध्ये सनस्पॉट (Sunspots) आणि फ्लेअर्स (Flares) प्रमुख आहेत.याचा परिणाम पृथ्वीच्या हवामानावर होऊ शकतो.

6 डिसेंबरला टिपला पहिला फोटो
आदित्य एल-1 चा सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप पहिल्यांदा 20 नोव्हेंबर, 2023 रोजी ऑपरेट करण्यात आला होता. या टेलिस्कोपने 6 डिसेंबर, 2023 ला सूर्याचा पहिला फोटो टिपला. हा टेलिस्कोप सूर्याच्या वायुमंडळाचे सविस्तर निरीक्षण करण्यासाठी 11 वेगवेगळ्या फिल्टरचा वापर करतो.

याशिवाय इस्रोने म्हटले होते, सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप तयार करण्यासाठी इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड एस्ट्रोफिजिक्स (IUCAA), पुणे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्याचा प्रयत्न केला होता.

आणखी वाचा: 

Platform Ticket Validity : प्लॅटफॉर्म तिकिटाची वैधता किती तासांची असते? अधिक वेळ थांबल्यास...

श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 3 हजार VVIPना आमंत्रण, यादीत आहेत ही मोठी नावं

Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवस 41 कामगार फिट राहण्यामागील सीक्रेट

Share this article