सार

पॉडकास्टमध्ये, रोसान्ना म्हणते की, वडील मरण्यापूर्वी तिच्याशी ही इच्छा व्यक्त केली होती.

मृत पूर्वजांना विविध प्रकारे आदरांजली वाहण्याचे प्रकार आपण पाहिले असतील. पण, एका अमेरिकन YouTuber ने केलेले कृत्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. YouTuber रोसान्ना पान्सिनो ही आपल्या मृत वडिलांना अतिशय असामान्य पद्धतीने आदरांजली वाहत आहे. 

'Rodiculous' या तिच्या नवीन पॉडकास्टच्या पहिल्या भागात, 39 वर्षीय रोसान्ना आपल्या वडिलांच्या अस्थी ठेवलेल्या भांड्यात वाढवलेला गांजा ओढून त्यांना आदरांजली वाहते. 'स्मोकिंग माय डेड डॅड' असे तिने या भागाला नाव दिले आहे. 

पॉडकास्टमध्ये, रोसान्ना म्हणते की, वडील मरण्यापूर्वी तिच्याशी ही इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या अस्थींपासून गांजा वाढवावा अशी त्यांची विचित्र इच्छा होती. पाच वर्षांपूर्वी रोसान्नाचे वडील निधन पावले. रोसान्नाचे YouTube वर 14.6 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर आहेत. 'पापा पित्झा' असे ती आपल्या वडिलांना म्हणायची. सहा वर्षे ते ल्युकेमियाने ग्रस्त होते. 

रविवारच्या भागात, रोसान्नाची बहीण मोली आणि आई जीना तिच्यासोबत दिसतात. 

वडील मरण्यापूर्वी त्यांच्या अस्थींमध्ये वाढवलेला गांजा आम्ही ओढावा अशी इच्छा व्यक्त केली होती. वडील खूप छान होते, थोडेसे क्रांतिकारी होते, असेही रोसान्ना म्हणते. वडिलांची इच्छा कशी पूर्ण करायची हे मला माहीत नव्हते, लोक काय म्हणतील याचा विचार करत होते. पण, आता वडिलांची इच्छा पूर्ण केली आहे, असे ती म्हणते. 

View post on Instagram
 

त्यासाठी, कॅलिफोर्नियातील गांजा वाढविण्याचे परवाना असलेल्या एका व्यक्तीशी संपर्क साधला. वडिलांच्या अस्थी मातीत मिसळून त्या भांड्यात गांजा वाढवला. तोच मी ओढत आहे, असे ती म्हणते. 

रोसान्नाच्या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी वडिलांची इच्छा पूर्ण केल्याबद्दल तिचे कौतुक केले, तर काहींनी टीकाही केली आहे.