Worlds First Dinosaur Leather Handbag : फॅशन जगतात एकच खळबळ उडाली आहे, कारण चक्क डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेली जगातली पहिली हँडबॅग समोर आली आहे. तब्बल ६.६ कोटी वर्षांपूर्वीच्या प्राण्याच्या चामड्याची बॅग कशी बनवली? जाणून घ्या.

Worlds First Dinosaur Leather Handbag : विज्ञान आणि टेक्नॉलॉजी एकत्र आले की काहीही शक्य आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तब्बल ६.६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेल्या डायनासोरचे आज फक्त सांगाडे आणि जीवाश्म (fossils) सापडतात. त्यांची त्वचा तर कधीच नष्ट झाली. पण तरीही, शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी मिळून एक कमाल केली आहे. फ्रान्सच्या एका फॅशन ब्रँडने डायनासोरच्या चामड्यापासून बनवलेली एक हँडबॅग लाँच केली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

आता प्रश्न पडतो की डायनासोरची त्वचा आली कुठून? तर ही बॅग जीवाश्मांपासून बनवलेली नाही. शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये 'कोलेजन' (Lab-grown collagen) वापरून ही त्वचा तयार केली आहे. यासाठी त्यांनी डायनासोरच्या डीएनएची (DNA) माहिती वापरली. एखाद्या नष्ट झालेल्या प्राण्याच्या डीएनए सिक्वेन्सचा वापर करून, अगदी तशाच प्रकारचं प्रोटीन लॅबमध्ये वाढवण्यात आलं.

लॅबमध्ये तयार झालेली ही त्वचा दिसायला आणि स्पर्शाला हुबेहूब खऱ्या चामड्यासारखीच आहे. याच त्वचेचा वापर करून ही खास हँडबॅग बनवण्यात आली आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध फॅशन ब्रँड 'क्लोई' (Chloé) ने ही बॅग तयार केली आहे. सध्या प्रदर्शनासाठी फक्त एकच बॅग बनवण्यात आली आहे. पण या प्रयोगामुळे भविष्यात अशा अनेक गोष्टींसाठी एक नवीन दार उघडलं आहे.

डायनासोरच्या चामड्याच्या बॅगचा उद्देश काय?

लेदरच्या बॅग, पर्स, बेल्ट अशा वस्तूंना मोठी मागणी आहे आणि त्या खूप महागही असतात. या वस्तूंसाठी प्राण्यांची हत्या केली जाते. पण 'क्लोई' ब्रँडने हे दाखवून दिलं आहे की, प्राण्यांना कोणतीही इजा न करता, पर्यावरणाला पूरक असं चामडं तयार करून वस्तू बनवणं शक्य आहे. या टेक्नॉलॉजीमुळे भविष्यात असे अनेक प्रोडक्ट्स बनवता येतील. हे फॅशनच्या जगात एक नवीन, शाश्वत (sustainable) आणि अहिंसक पर्व असेल, असं कंपनीचं म्हणणं आहे.