Usha Vance : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांच्या पत्नी उषा वान्स यांनी आपण चौथ्यांदा गरोदर असल्याची घोषणा केली आहे. जुलैच्या अखेरीस मुलाच्या आगमनासाठी आपण उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे देशाच्या सेकंड लेडी उषा यांनी म्हटले आहे.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांच्या पत्नी उषा वान्स यांनी आपण चौथ्यांदा गरोदर असल्याची घोषणा केली आहे. जुलैच्या अखेरीस मुलाच्या आगमनासाठी आपण उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे देशाच्या सेकंड लेडी उषा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
वान्स आणि उषा यांना तीन मुले आहेत. इवान, विवेक आणि मिराबेल अशी त्यांची नावे आहेत. उषा वान्स यांचा जन्म आणि वाढ कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथे झाली. त्या आंध्र प्रदेशातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या दाम्पत्याची मुलगी आहेत.
पदावर असताना बाळाला जन्म देणाऱ्या पहिल्या व्यक्ती
२०१० मध्ये येल लॉ स्कूलमध्ये विद्यार्थिनी असताना एका डिबेट ग्रुपमध्ये त्यांची जे.डी. वान्स यांच्याशी भेट झाली. त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील मुंगेर, टोल्स अँड ओल्सन या फर्ममध्ये कॉर्पोरेट लिटिगेटर म्हणून काम केले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स आणि अपील न्यायालयाचे न्यायाधीश ब्रेट कॅव्हानो यांच्यासाठीही काम केले आहे. सेकंड लेडी पदावर असताना बाळाला जन्म देणाऱ्या उषा वान्स या पहिल्या व्यक्ती आहेत. अमेरिकेत जन्मदर वाढवण्याची मागणी करणाऱ्या ट्रम्प प्रशासनातील वान्स हे एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत.


