US Military KC 135 Tanker Crashes in Iraq : इराकमध्ये अमेरिकेचं KC-135 हे इंधन भरण्याचं लष्करी विमान कोसळलं आहे. हा अपघात कोणत्याही हल्ल्यामुळे झालेला नाही आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे, असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे.

US Military KC 135 Tanker Crashes in Iraq : पश्चिम इराकमध्ये अमेरिकेचं एक लष्करी विमान कोसळलं आहे. मात्र, हा अपघात कोणत्याही हल्ल्यामुळे झालेला नाही, असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. कोसळलेलं विमान KC-135 प्रकारचं असून, ते हवेत दुसऱ्या विमानांमध्ये इंधन भरण्याचं काम करतं. अमेरिकेने तातडीने बचावकार्य सुरू केल्याची माहिती दिली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

दरम्यान, आखाती प्रदेशात इराणकडून हल्ले सुरूच आहेत. ओमानमध्ये पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. इराणने बहरीनसह इतर आखाती देशांना लक्ष्य करत मिसाइल हल्ले केले आहेत. अरबी आखात, होर्मुझची सामुद्रधुनी आणि ओमानच्या समुद्रात परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचा इशारा यूकेच्या सागरी एजन्सीने दिला आहे.

याचदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे. जर इराणने संघर्ष वाढवला, तर आम्ही त्यांच्या वीज आणि इतर पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करू, असं ट्रम्प म्हणाले. एका तासाच्या आत अमेरिका हे करू शकते, असंही त्यांनी म्हटलं. त्यावर इराणनेही प्रत्युत्तर दिलं आहे. जर अमेरिकेने आमच्या वीज प्रकल्पांवर हल्ला केला, तर आम्ही संपूर्ण प्रदेशातील पॉवर ग्रिडवर हल्ला करू, असा इशारा इराणने दिला आहे.