बँकॉकच्या ऑर टोर कोर मार्केटमध्ये गोळीबारात किमान ६ जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने नंतर आत्महत्या केली. पोलिस याचा तपास करत आहेत.
थायलंडच्या बँकॉकमधील चतुचक जिल्ह्यातील ऑर टोर कोर मार्केटमध्ये सोमवारी झालेल्या गोळीबारात किमान ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बाजारातील एक विक्रेता आणि तीन सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश मृतांमध्ये आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बंदूक हातात धरलेला हल्लेखोर दिसतो. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
हल्ल्यामागील त्याचे हेतू अधिकारी तपासत आहेत.
दुसऱ्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये बाजारपेठेतील गोंधळाची दृश्ये दिसत आहेत.
अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे थायलंड-कंबोडिया सीमा तणाव कमी
दरम्यान, असोसिएटेड प्रेसच्या मते, रविवारी थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसून आली कारण दोन्ही देशांनी सीमा संघर्ष समाप्त करण्यासाठी वाटाघाटी करण्याची इच्छा व्यक्त केली. या संघर्षात आतापर्यंत किमान ३३ जणांचा बळी गेला असून १,६८,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वादात हस्तक्षेप केला. ट्रुथ सोशलवर पोस्ट करून सांगितले की त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांशी बोलणे केले आहे. त्यांनी इशारा दिला की पुढील हिंसाचारामुळे अमेरिकेशी असलेले व्यापारी करार धोक्यात येऊ शकतात. दोन्ही बाजूंना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.


