रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपान, हवाई, चिली, न्यूझीलंडसह धोक्यात असलेल्या देशांची आणि बेटांची संपूर्ण यादी येथे पहा.
मॉस्को- रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ आलेल्या ८.८ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपामुळे पॅसिफिक महासागरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रशियाच्या कुरील बेटांवर आणि जपानच्या होक्काइडो बेटांवर लाटा पोहोचल्याने अनेक राष्ट्रे सतर्क आहेत.
अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीने त्सुनामीच्या लाटा येऊ शकणाऱ्या देशांची आणि बेटांची सविस्तर यादी प्रसिद्ध केली आहे.
३ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता
- इक्वेडोर
- रशिया
- नॉर्थवेस्टर्न हवाईयन बेटे
१ ते ३ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता
- चिली
- कोस्टा रिका
- फ्रेंच पॉलिनेशिया
- गुआम
- हवाई
- जपान
- जार्व्हिस बेट
- जॉन्सटन अॅटॉल
- किरिबाटी
- मिडवे बेट
- पामिरा बेट
- पेरू
- समोआ
- सोलोमन बेटे
०.३ ते १ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता
- अंटार्क्टिका
- ऑस्ट्रेलिया
- चूक
- कोलंबिया
- कुक बेटे
- एल साल्व्हाडोर
- फिजी
- ग्वाटेमाला
- हॉलंड आणि बेकर बेटे
- इंडोनेशिया
- कर्माडेक बेटे
- कोस्ऱ्हाए
- मार्शल बेटे
- मेक्सिको
- नौरू
- न्यू कॅलेडोनिया
- न्यूझीलंड
- निकाराग्वा
- निउए
- नॉर्दर्न मारियाना बेटे
- पलाऊ
- पनामा
- पापुआ न्यू गिनी
- फिलीपिन्स
- पिटकेर्न बेटे
- पोह्नपेई
- तायवान
- टोकेलाऊ
- टोंगा
- तुवालू
- व्हानुआटू
- वेक बेट
- वॉलिस आणि फुतुना
- अमेरिकन समोआ
- याप
०.३ मीटरपेक्षा कमी उंचीच्या त्सुनामी लाटा येण्याची शक्यता
- ब्रुनेई
- चीन
- उत्तर कोरिया (डीपीआरके)
- मलेशिया
- दक्षिण कोरिया (रिपब्लिक ऑफ कोरिया)
- व्हिएतनाम
न्यूझीलंडने धोकादायक त्सुनामीचा दिला इशारा
न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने (NEMA) किनारी भागात जोरदार आणि अनपेक्षित समुद्री प्रवाहांचा इशारा दिला आहे.
"जोरदार प्रवाह आणि लाटा लोकांना जखमी करू शकतात किंवा बुडवू शकतात. पोहणारे, सर्फर, मासेमार आणि किनाऱ्याजवळील कोणालाही धोका आहे," असे NEMA ने म्हटले आहे.
धोका पूर्णपणे टळेपर्यंत लोकांना समुद्रकिनारे, बंदरे, नौकास्थळे, नद्या आणि खाड्यांपासून दूर राहण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
पॅसिफिक प्रदेश सतर्क आहे. पॅसिफिक प्रदेशातील अधिकारी समुद्राच्या पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. धोक्यात असलेल्या किनारी भागातील रहिवाशांना समुद्रकिनारे आणि कमी उंचीच्या भागात जाऊ नका आणि आपत्कालीन सूचनांसह अपडेटेड रहा असा सल्ला देण्यात आला आहे.


