Plane Crash 13 Death : उड्डाणानंतर काही वेळातच विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळल्यानंतर जळून खाक झालं आहे.

पेरू : मागील काही दिवसांपासून विमान अपघाताच्या बातम्या समोर आल्या आहेत. अशीच एक विमान अपघाताची भीषण घटना घडली आहे. शनिवारी एका विमानाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता, की विमान कोसळल्यानंतर ते जळून खाक झालं आहे. यात ११ पर्यटकांसह दोन कर्मचारी अशा एकूण १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पेरूमधील एका वाळवंटावर हे विमान कोसळलं. जगप्रसिद्ध नाझ्का लाइन्स पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या विमानाचा अपघात झाला. नाझ्का प्रशासनाने एका अधिकृत निवेदनात या अपघाताची माहिती दिली आहे.

उड्डाणाच्या काही मिनिटांत भयंकर घडलं?

शनिवारी सकाळी पेरू येथील नाझ्का वाळवंटात 'एरोडियाना' या कंपनीचं 'सेसना ग्रँड कॅराव्हॅन' हे विमान ११ पर्यटकांना घेऊन निघालं होतं. पर्यटकांना नाझ्का हे जगप्रसिद्ध ठिकाण दाखवलं जाणार होतं. पण विमानाने टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांत त्याचा अपघात झाला आणि होत्याचं नव्हतं झालं.

Scroll to load tweet…

ज्यावेळी विमानाचा अपघात झाला, त्यावेळी प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नाझ्का शहराच्या बाहेर एका शेतात कोसळलं. हा विमान अपघात इतका भीषण होता, की विमान खाली कोसळल्यानंतर जळून खाक झालं. आतील सर्व १३ जणांचा मृत्यू झाला.

अपघातात मृत्यू झालेले पर्यटक हे परदेशी नागरिक होते. पेरूमधील प्राचीन वारसा, येथील निसर्गदृश्य पाहण्यासाठी ते आले होते. यात २ कर्माचारी आणि ११ मृतांमध्ये दोन स्पॅनिश, दोन जर्मन आणि सात इटालियन पर्यटकांचा समावेश आहे.

'एरोडियाना' कंपनीचं 'सेसना ग्रँड कॅराव्हॅन' विमान

विमानांची ही कंपनी आपल्या सर्व विमानांचा वापर सिनिक फ्लाईट्स अर्थात विमानातून खालील निसर्गदृश्यं पाहण्यासाठी करत होती. जिओग्लिफ्स अर्थात जमिनीवरील भव्य आकृत्या या विमानातून प्रवाशांना दाखवल्या जायच्या. 'एरोडियाना' कंपनीची ही विमानं मागील १४ वर्षांपासून या भागात, या मार्गांवर सिनिक फ्लाईट्स म्हणून सेवा देत होती. मात्र शनिवारी झालेल्या भीषण अपघातानंतर विमानाच्या सुरक्षेततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पेरूमधील प्राचीन पर्यटन स्थळ

विमानाचा ज्या भागात अपघात झाला ते ठिकाण येथील प्राचीन पर्यटन स्थळ आहे. प्राचीन पेरूच्या मूळ रहिवाशांनी नाक्झा हे ठिकाण निर्माण केलं आहे. इथे केवळ आकाशातूनच किंवा एखाद्या उंच ठिकाणावरुन हे पाहता येतं. हे ठिकाण पाहण्यासाठी विमानातून निघाले असतानाच विमानाचा अपघात झाला आणि आनंदाचा क्षण दु:खात बुडाला. आता विमानाचा अपघात कसा झाला? अपघातामागे तांत्रिक बिघाड की इतर काही कारण आहे, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.