सार

एका तरुणीच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा सीसीटीव्ही कॅमेरा तिच्या डोक्यावर का बसवण्यात आला आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती... 
 

गेल्या काही दिवसांपासून एका तरुणीच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे एआय युग आहे. या युगात काहीही होऊ शकते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना तो बनावट असावा असे वाटले. पण नंतर त्या तरुणीने एका माध्यमांना मुलाखत दिली आणि आपल्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे कबूल केले.

ही तरुणी भारतीय नसून पाकिस्तानी आहे. पाकिस्तानात महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. त्यामुळेच आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी एका वडिलांनी तिच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. ही तरुणी कराचीची आहे. कराचीमध्ये महिलांवरील अत्याचार वाढत असल्याने वडिलांनी तिच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचे तिने मुलाखतीत सांगितले.

 मी आणि माझे कुटुंब पाकिस्तानात राहतो. पाकिस्तानात महिलांवरील अत्याचारांच्या घटना खूप वाढल्या आहेत. माझ्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावर हा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. यामुळे मी कुठे जाते, काय करते, कधी परत येते हे सगळं माझ्या वडिलांना कळतं, असं ती म्हणाली. यावर तुझा काही आक्षेप आहे का, असा प्रश्न विचारला असता तिने नाही असं उत्तर दिलं. जर कोणी मला मारहाण केली तर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुरावा असेल असंही ती म्हणाली. 

यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. असा आइडिया पाकिस्तानींनाच सुचू शकतो, अशी खिल्ली उडवली जात आहे. काहींनी विचारले आहे की, सीसीटीव्ही कॅमेरा असला तरी गुन्हेगारांना काय फरक पडतो? तर काहींनी हा कॅमेरा सहज काढून टाकता येईल असं म्हटलं आहे. काहींनी म्हटले आहे की, या वडिलांना मुलीवरच शंका असेल, मुलांवर नाही. ती कुठे जाते हे त्यांना कळायला हवे आहे. पाकिस्तानात मुलींना बाहेर जाण्याची फारशी परवानगी नसते. त्यामुळे मुलीवर शंका येऊ नये म्हणून त्यांनी हा उपाय केला असावा.