Pakistani अभिनेत्री Javeria Abbasi चे 51 व्या वर्षी दुसरे लग्न, चाहत्यांनी केले Troll !
पाकिस्तानी अभिनेत्री जव्हेरिया अब्बासी यांनी ५१ व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. त्यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. तिच्या मुलीसमोर झालेल्या या लग्नावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

सासू-सासरेही उपस्थित
आजी-आजोबा होण्याच्या वयात पुन्हा लग्न का केलंत? असा सवाल करत नेटकरी या जोडप्याला ट्रोल करत आहेत. यावर अभिनेत्रीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या लग्नाला अभिनेत्रीची मुलगी आणि तिचे सासू-सासरेही उपस्थित होते.
वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत
जव्हेरिया अब्बासी ही पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जव्हेरिया आपल्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. २०२४ मध्ये तिने ५१ व्या वर्षी दुसरे लग्न केले. तिची मुलगी, जावई आणि सासू-सासरेही लग्नाला उपस्थित होते.
मुलगीही अभिनेत्री
जव्हेरियाने १९९७ मध्ये आपला चुलत भाऊ शमून अब्बासीशी लग्न केले होते. १२ वर्षांच्या संसारानंतर २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना अँजेला अब्बासी नावाची एक मुलगी आहे. जव्हेरियाप्रमाणे अँजेलाही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर दिली माहिती
सुमारे १५ वर्षांच्या घटस्फोटानंतर, जव्हेरियाने ५१ व्या वर्षी उद्योजक आदिल हैदरशी लग्न केले आहे. या दुसऱ्या लग्नामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून तिने आपल्या चाहत्यांना लग्नाची माहिती दिली. यासाठी काहींनी तिला ट्रोल केले आहे.
आम्ही एकाच वयाचे
एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जव्हेरियाचे पती आदिल यांनी ट्रोलिंगबाबत मौन सोडले. "लोकांनी आमच्याबद्दल खूप वाईट कमेंट्स केल्या आहेत. आमच्यात वयाचे अंतर नाही. आम्ही एकाच वयाचे आहोत. आमचा प्राधान्यक्रमही सारखाच आहेत. मीही मुस्लिम आहे," असे त्यांनी सांगितले.

