Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये तणाव वाढला गेला आहे. अशातच पाकिस्तानच्या मंत्र्याने मध्यरात्रीच पत्रकार परिषद बोलावत भारत हल्ला करणार असल्याचा दावा केला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसलर घाटात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार (Attaullah Tarar) यांनी 29 एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत तरार यांनी दावा केला की, भारत पुढील 24 ते 36 तासात पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. याशिवाय भारताकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यासंदर्भात आमच्याकडे पुरेसे पुरावे देखील आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

पाकिस्तानचे मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले की, पाकिस्तानकडे विश्वासनीय गुप्त माहिती आहे की, 'भारत पहलगाम हल्ल्यामुळे पुढील 24-36 तासात पाकिस्तानच्या विरोधात सैन्य कारवाई करू शकतो."

Scroll to load tweet…

याशिवाय अताउल्लाह तरार यांनी असाही दावा केलाय की, भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला सडेतोड उत्तर देईल. दरम्यान, तरराने असेही म्हटले की, पाकिस्तान स्वत: दहशवादाचा शिकार झाला आहे आणि पहलगामचे दु:ख समजू शकतो. तरारन जागतिक मंचावर पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी मंत्र्याचे हे विधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उच्च स्तरीय बैठकीनंतर समोर आले आहे. मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन सैन्याचे प्रमुख, NSA अजीत डोवाल, CDS अनिल चौहान यांच्यासोबत दीड तास उच्च स्तरीय बैठक बोलावली होती. यावरुन असे बोलले जात आहे की, पंतप्रधान मोदी यांनी सैन्याला फ्री हँड्स दिले आहेत. दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्याची पद्धत, लक्ष्य आणि वेळ सैन्याता आता ठरवायची आहे.