कर्नाटकच्या एका जोडप्यामध्ये पत्नीने पतीच्या अंडरवियरवर तिचा फोटो छापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठालला आहे. या प्रकारच्या भेटवस्तू सध्या ट्रेंडिंग आहेत.
बांगलादेशातील इस्कॉनशी संबंधित वाद ५ नोव्हेंबर रोजी एका स्थानिक उद्योजकाच्या फेसबुक पोस्टमुळे सुरू झाला. त्यांनी इस्कॉनला दहशतवादी गट म्हटले होते. या पोस्टमुळे हिंदूंमध्ये संताप निर्माण झाला आणि हिंसाचाराला कारणीभूत ठरला.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात पोहोचली असून तिचा दौरा सुरू झाला आहे. भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने सामने दुबईत होऊ शकतात. पीओकेमध्ये ट्रॉफीच्या दौऱ्यावर आयसीसीने बंदी घातली आहे.
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारने संविधानातून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द वगळण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली आहे. मुजीबुर रेहमान यांचे 'राष्ट्रपिता' पदही काढून टाकावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
लेखिका आणि समाजसेविका मॅकेन्झी स्कॉट यांनी त्यांच्याकडे असलेले अमेझॉन कंपनीचे ११% शेअर्स विकले आहेत. या शेअर्सची किंमत ८ अब्ज अमेरिकन डॉलर (₹६७,५३८ कोटी) आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ३८ अब्ज डॉलरवरून ३० अब्ज डॉलरवर आली आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यांनी त्यांच्या मांजरीच्या केस कापण्यासाठी ₹४५,००० खर्च केले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये हे केस कापण्यात आले असून, वैद्यकीय तपासणी, भूल देणे यासह अनेक शुल्क यामध्ये समाविष्ट आहेत.
Unbabel नावाच्या अनुवाद सेवा पुरवणाऱ्या स्टार्टअपने नवीन Widn.AI अॅप लाँच केला आहे, जो पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे. सीईओ वास्को पेड्रो यांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे तीन वर्षांत मानवी अनुवादकांची गरज संपुष्टात येऊ शकते.
गिलगित-बाल्टिस्तानमध्ये एक भीषण बस अपघात झाला आहे. लग्नाला जाणारी बस सिंधु नदीत पडली, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला. वेग जास्त असल्याने हा अपघात झाला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना राष्ट्रीय गुप्तचर संचालक (DNI) म्हणून नियुक्त केले आहे. गबार्ड अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या हिंदू महिला ठरतील.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्या पुनरागमनानंतर डॉगकॉइनच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. फक्त १० दिवसांतच ही क्रिप्टोकरन्सी १५५% ने वाढली आहे. याचा संबंध एलन मस्कशी देखील आहे.
World