बांगलादेशमध्ये 50,000 लष्करी गणवेश जप्त करण्यात आले आहेत, जे KNF या दहशतवादी संघटनेशी जोडले गेले आहेत. ही घटना भारताच्या ईशान्य सीमेसाठी धोकादायक ठरू शकते आणि यामागे एका मोठ्या 'प्रॉक्सी वॉर'ची शक्यता वर्तवली जात आहे.
Google Chrome वरील अनेक लोकप्रिय एक्स्टेन्शन्स वापरकर्त्यांचा संवेदनशील डेटा असुरक्षित HTTP कनेक्शन्सद्वारे पाठवत आहेत. यामुळे लाखो वापरकर्त्यांना गंभीर गोपनीयता आणि सुरक्षा धोक्यांना सामोरे जावे लागत आहे.
World’s Most Beautiful Handwriting : नेपाळमधील प्रकृती मल्ल्या सर्वाधिक सुंदर हस्ताक्षर असणारी मुलगी ठरली आहे. तिच्या काही असाइनमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या लेखानाचे कौतुक करण्यास सुरुवात झाली.
एका काळी एकमेकांचे विश्वासू समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यात आता राजकीय वाद चिघळले आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात मस्क यांना महत्त्वाची भूमिका मिळाली होती.
रशियाने युक्रेनवर भीषण मिसाइल हल्ला केला, ज्यामुळे रात्री दिवसासारखे उजळले. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला आणि ८० जण जखमी झाले. युक्रेनने अनेक मिसाइल आणि ड्रोन पाडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य आशियाई देशांसोबतच्या संबंध मजबूत करण्यावर भर दिला आहे. दहशतवाद, व्यापार, कनेक्टिव्हिटी, ऊर्जा, फिनटेक, अन्नसुरक्षा आणि आरोग्य या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.
युद्धग्रस्त गाजामध्ये, भारतात फक्त ५ रुपयांना मिळणारे पार्ले-जी बिस्किटे २,३४२ रुपयांना विकले जात आहे. इस्रायलच्या लष्करी कारवाईनंतर गाजाला अन्न पुरवठा कमी झाला आहे, ज्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत.
इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. ट्रम्प यांच्या 'वन बिग ब्यूटीफुल बिल' नंतर दोघांचे संबंध बिघडले आणि आता ते सार्वजनिकपणे एकमेकांवर आरोप करत आहेत. मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर एपस्टीन फाईल्समध्ये नाव असल्याचा आरोपही केला.
झिबाब्वे आपल्या वाढत्या हत्तींच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी डझनभर हत्तींना मारण्याची योजना आखत आहे. हे मांस स्थानिक समुदायांना अन्न म्हणून वाटप केले जाईल, तर हस्तिदंत सरकारकडे राहील.
भारताला अंतराळातून अत्यंत सखोल गुप्तचर माहिती मिळवता येणार आहे. मात्र या प्रकल्पाला पहिल्याच पायरीत जानेवारी २९, २०२५ रोजी लाँच करण्यात आलेल्या NVS-02 या उपग्रहाच्या अपयशाने मोठा धक्का बसला.
World