- Home
- World
- Israel Attack : गेल्या 72 तासांत इस्रायलचा चक्क 6 देशांवर हल्ला, 200 मृत्युमुखी, सर्वांना दणाणून सोडले!
Israel Attack : गेल्या 72 तासांत इस्रायलचा चक्क 6 देशांवर हल्ला, 200 मृत्युमुखी, सर्वांना दणाणून सोडले!
Israel Attack : गेल्या ७२ तासांत इस्रायलने सहा देशांवर हवाई हल्ले केले आहेत. गाझा, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या देशांमध्ये झालेल्या या हल्ल्यांमध्ये २०० हून अधिक लोक मारले गेले आहेत.

७२ तासांत ६ देशांवर हल्ला
इस्त्रायलने गेल्या ७२ तासांत सहा देशांवर हवाई हल्ले केले आहेत. गाझा, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या देशांमध्ये झालेल्या या हल्ल्यांमध्ये २०० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत आणि १,००० हून अधिक जखमी झाले आहेत.
सोमवार ते बुधवार या काळात झालेले हे हल्ले "दहशतवादी छावण्यांना" लक्ष्य करून करण्यात आल्याचे इस्रायल सैन्याने म्हटले आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या हल्ल्यांबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
कतारमध्ये हमास नेत्यावर हल्ला
कतारची राजधानी दोहा येथे हमास संघटनेचे वरिष्ठ नेते खलील अल-हय्या यांना लक्ष्य करून इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात सहा जण ठार झाले. यात अल-हय्या यांचा मुलगा, त्यांचे कार्यालय संचालक, तीन अंगरक्षक आणि एक कतारी सुरक्षा अधिकारी यांचा समावेश आहे.
हल्ला झाला तेव्हा हमास नेते अमेरिकेच्या युद्धबंदीच्या प्रस्तावावर चर्चा करत होते. या हल्ल्यानंतर हमासने युद्धबंदीचा करार फेटाळला. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने कशी कारवाई केली याच्याशी तुलना करून नेतन्याहू यांनी या हल्ल्याचे समर्थन केले.
लेबनॉन, सीरियात हल्ले
लेबनॉनच्या पूर्वेकडील बेका आणि हेर्मल जिल्ह्यांमध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये पाच जण ठार झाले. हे हल्ले हिजबुल्ला संघटनेच्या लष्करी छावण्यांना लक्ष्य करून करण्यात आल्याचे इस्रायल सैन्याने म्हटले आहे. मात्र, हिजबुल्लाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सीरियामध्ये, इस्रायली लढाऊ विमानांनी सीरियन हवाई दलाचा तळ आणि लष्करी छावणींवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स (SOHR) ने म्हटले आहे.
येमेन, ट्युनिशियात हल्ले
येमेनची राजधानी सानावर १५ दिवसांत इस्रायलने दुसऱ्यांदा हल्ला केला आहे. हा हल्ला हौथी संघटनेच्या ठिकाणांना लक्ष्य करून करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
ट्युनिशियातील एका बंदरात एका कुटुंबाच्या बोटीवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे म्हटले जात आहे.
गाझावर हल्ले
इस्त्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामध्ये सोमवारी सुमारे १५० लोक ठार झाले आणि ५४० जखमी झाले. २०२३ पासून इस्रायली हल्ल्यांमध्ये गाझामध्ये ६४,६०० हून अधिक पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत. यामध्ये ४०० लोक उपासमारीने आणि हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकून मरण पावले आहेत. गाझाचा ७५% भाग सध्या इस्रायलच्या ताब्यात आहे.

