आधुनिक तंत्रज्ञानात केलेल्या गुंतवणुकीमुळे देशाची संरक्षण क्षमता तिपटीने वाढली आहे, असा दावा इराणच्या काळजीवाहू संरक्षणमंत्र्यांनी केला आहे. कठीण परिस्थिती आणि निर्बंधांवर मात करून इराणने ड्रोन उत्पादन क्षमता वाढवली, असंही ते म्हणाले.
तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यावेळी आधुनिक तंत्रज्ञानात केलेल्या गुंतवणुकीमुळे इराणची संरक्षण क्षमता तिपटीने वाढण्यास मदत झाली, असं इराणचे काळजीवाहू संरक्षण मंत्री माजिद इब्न अल-रेझा यांनी म्हटलं आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था 'तस्नीम'ने संरक्षण मंत्र्यांचं हे विधान प्रसिद्ध केलं आहे. अलीकडच्या युद्धाने हे सिद्ध केलं आहे की, देशातील हुशार लोकांची प्रतिभा आणि तांत्रिक प्रगती हेच इराणच्या संरक्षण शक्तीचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

युद्ध अगदी टोकाच्या टप्प्यात असतानाही देशातील लष्करी आणि संरक्षण उत्पादन अजिबात थांबलं नाही, असा दावा मंत्र्यांनी केला. कठीण परिस्थितीवर मात करून इराणने ड्रोनची उत्पादन क्षमता तिपटीने वाढवली. शत्रूंचे हवाई हल्ले आणि कठोर निर्बंधांवर मात करून देशांतर्गत शस्त्र उत्पादन वाढवणं, हे इराणच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेचा पुरावा आहे, असं संरक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे.
ड्रोनचं तंत्रज्ञान अत्याधुनिक करुन ते युद्धासाठी किंवा देशाची संरक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी जगभर वापरलं जाईल, हे सुरुवातीला वाटत नव्हतं पण त्याचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगात जेथे जेथे 2 देशांमध्ये युद्ध संघर्ष पेटला आहे, एकमेकांवर हल्ले केले जात आहेत, तेथे तेथे ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
ड्रोन वापरणाऱ्या देशाला हल्ला करणे सोपे जाते, तसेच त्याचं सैनिकांचा जीव जाईल असं कोणतंही नुकसान होत नाही, मात्र या उलट शत्रू पक्षावर हल्ला करण्यासाठी याचा वापर होतो, ड्रोन ट्रॅक झाला नाही तर हवा तेथे हल्ला करता येतो, शत्रू पक्षाच्या भागाची हवाई रेकी केली जाते.
यात ड्रोन पकडला गेला तरी मोठं नुकसान होत नाही. पण यापुढे ड्रोन हल्ले थांबवण्यासाठी किंवा जवळ ड्रोन फिरत आहे, हे ओळखण्याचं तंत्रज्ञान देखील विकसित करण्याची गरज वाढणार आहे. भारत पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला होता, तेव्हा देखील तुर्कीच्या मदतीने पाकिस्ताननने मोठ्या प्रमाणात ड्रोन वापरण्याचा प्रयत्न केला होता.
शत्रु राष्ट्राच्या सीमेत शत्रूने एखादं लढाऊ विमान पाडलं तरी पायलटचा जीव जातो आणि फाईटर प्लेनचंही नुकसान होतं, हा मोठा आर्थिक आणि जिवित हानीचा फटका असतो, पण ड्रोनच्या बाबतीत तसेच दिसून आलेले नाही, ड्रोन जरी शत्रू राष्ट्राने पाडलं तरी यात जिवित हानी तर होतंच नाही, पण फाईटर प्लेनच्या तुननेत हे नुकसान कुठेच नसतं,


