Indian Student Shot Dead in Toronto Canada : पीएचडीचा विद्यार्थी शिवांक अवस्थी याची हत्या झाली आहे. कॅनडामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या हत्येच्या बातमीमुळे भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
Indian Student Shot Dead in Toronto Canada : कॅनडातील टोरंटो विद्यापीठाजवळ एका भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पीएचडीचा विद्यार्थी शिवांक अवस्थी याची हत्या झाली आहे. टोरंटो विद्यापीठाच्या स्कारबोरो कॅम्पसजवळ 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या झाली. शिवांकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या वर्षातील टोरंटोमधील ही 41 वी हत्या आहे. कॅनडामध्ये अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या हत्येची बातमी समोर आल्यानंतर भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी नागरिकांची मदत मागितली आहे. या घटनेबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कळवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. आरोपींचा सुगावा लावण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. शिवांक अवस्थीच्या हत्येवर भारताने तीव्र दुःख व्यक्त केले आहे. टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने विद्यार्थ्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.


