MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Singapore Slap Case : टॅक्सी ड्राव्हरला कानशिलात लगावणाऱ्या भारतीय महिलेला दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नक्की काय आहे प्रकरण?

Singapore Slap Case : टॅक्सी ड्राव्हरला कानशिलात लगावणाऱ्या भारतीय महिलेला दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नक्की काय आहे प्रकरण?

सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या महिलेला अटक आणि तुरुंगवास. SGD 24 (सिंगापूर डॉलर) च्या टॅक्सी भाड्यावरून तिने ७३ वर्षांच्या ड्रायव्हरला का मारलं? या वादामागचं नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Feb 20 2026, 07:52 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद
Image Credit : Social Media

टॅक्सी ड्रायव्हरसोबत वाद

सिंगापूर कोर्टाने ३६ वर्षीय भारतीय वंशाच्या शालिनी देवराजनला दोन आठवड्यांची जेल सुनावली आहे. तिने ७३ वर्षांच्या टॅक्सी ड्रायव्हरला कानाखाली मारून जखमी केल्याचा आरोप आहे. हा वाद टॅक्सीच्या भाड्यावरून सुरू झाला.
24
नक्की प्रकरण काय?
Image Credit : ChatGPT

नक्की प्रकरण काय?

कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली. शालिनी देवराजनने एकटीने टॅक्सी बुक केली आणि ड्रायव्हरला यिशुन हाऊसिंग इस्टेटमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये सोडायला सांगितलं. शालिनीने मद्यपान केल्याचं ड्रायव्हरच्या लक्षात आलं. अपार्टमेंटजवळ पोहोचल्यावर ड्रायव्हरने SGD 24 भाडं मागितलं. तेव्हा शालिनी म्हणाली की तिच्याकडे रोख रक्कम किंवा ऑनलाइन पेमेंटचा पर्याय नाही.

Related Articles

Related image1
'पती पत्नीला मारहाण करु शकतो, पण तिला जखम होऊ नये, तिची हाडे मोडू नयेत!'
Related image2
अफगाणिस्तानात घरगुती हिंसाचार कायदेशीर, पतीच्या परवानगीशिवाय भेटायला गेल्यास पत्नीला 3 महिन्यांचा तुरुंगवास!
34
नक्की काय घडले?
Image Credit : Getty

नक्की काय घडले?

यानंतर शालिनीने कोणालातरी फोन केला आणि पैसे आणण्यासाठी वरती फ्लॅटमध्ये जात असल्याचं सांगितलं. ड्रायव्हरने तिला तिचा फोन तिथेच ठेवून जाण्यास सांगितलं, पण शालिनीने नकार दिला. सायंकाळी साधारण ४.२० वाजता तिने ड्रायव्हरच्या डाव्या गालावर चापट मारली. यानंतर ड्रायव्हरला वेदना झाल्या आणि त्याला उपचारासाठी एका दिवसाची वैद्यकीय रजा घ्यावी लागली.
44
महिलेला अटक
Image Credit : Getty

महिलेला अटक

टॅक्सीचं भाडं तर मिळालंच नाही, उलट पोलिसांनी शालिनीला त्याच दिवशी अटक केली. सरकारी वकिलांनी पीडित ड्रायव्हरच्या उपचारासाठी सुमारे SGD 172 नुकसान भरपाईची मागणी केली. शालिनीने दावा केला की तिच्याकडे पैसे नव्हते आणि तिच्या खिशात SGD 50 ची नोट होती हे तिला माहीत नव्हतं. कोर्टाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून देवराजनला दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mexico Violence : मेक्सिकोमध्ये गँगवॉर भडकला, रस्त्यावर जाळपोळ, भारतासह 3 देशांचा नागरिकांना धोक्याचा इशारा
Recommended image2
मॉस्कोवर एकाच वेळी युक्रेनच्या 11 ड्रोन्सचा हल्ला, चारही आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तास बंद!
Recommended image3
US Iran Conflict : अमेरिकेची इराणला घेरण्याची तयारी, मध्य पूर्वेत लष्करी हालचालींना वेग!
Recommended image4
US Assassination Plot : खामेनी आणि त्यांच्या मुलाच्या हत्येचा ट्रम्प यांचा 'सिक्रेट प्लॅन'? इराणवर हल्ल्याचीही तयारी!
Recommended image5
Trump Tariff Hike : ट्रम्प यांचा अमेरिकन सुप्रीम कोर्टालाच धक्का, 24 तासांत टॅरिफ 10% वरून 15%
Related Stories
Recommended image1
'पती पत्नीला मारहाण करु शकतो, पण तिला जखम होऊ नये, तिची हाडे मोडू नयेत!'
Recommended image2
अफगाणिस्तानात घरगुती हिंसाचार कायदेशीर, पतीच्या परवानगीशिवाय भेटायला गेल्यास पत्नीला 3 महिन्यांचा तुरुंगवास!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved