सार

मन दुखल्यावर अश्रू पुसून लोकांना सांत्वन देण्यासाठी सुंदर तरुणांची गरज भासत आहे! हा नवा व्यवसाय नेमका काय आहे ते जाणून घ्या.
 

कामाचा ताण, टेन्शन, नैराश्य या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणीतरी सांत्वन देणारी व्यक्ती असावी असे वाटणे स्वाभाविक आहे. दुःखी प्रसंगी अश्रू अनावर झाल्यावर कोणीतरी अश्रू पुसून सांत्वन देणारा असावा असे अनेकांना वाटते. मनाला शांत करण्यासाठी सांत्वन हे वेगवेगळ्या स्वरूपात प्रत्येकासाठी आवश्यक असते. सांत्वन देण्याची पद्धत वेगळी असली तरी मनातील चिंता, दुःख कमी करण्यासाठी कोणीतरी असावे असे वाटणारे तरुण, विशेषतः मुली यांची संख्या जास्त असल्याचे लक्षात घेऊन अश्रू पुसणाऱ्या मुलांना मागणी वाढली आहे!

मुलींचे अश्रू पुसल्यास साडेचार हजार रुपये मिळतात! तरुण देखणा असल्यास मागणी अधिक. हा आता एक व्यवसाय बनला आहे. मुलींच्या शेजारी जाऊन अश्रू पुसून त्यांना सांत्वन देणे एवढेच तरुणांचे काम. सोपे काम वाटते ना? पण हे सध्या भारतात नाहीये. हे आहे जपानमध्ये. कामाचा ताण कमी करण्यासाठी टोकियोतील कार्यालये हा अनोखा मार्ग अवलंबत आहेत. ७,९०० येन, म्हणजेच सुमारे ४,४०० रुपये खर्च करून जपानमधील लोक ही सेवा घेऊ शकतात.

 "हँडसम वीपिंग बॉइज" (इकेमेसो डान्शी- आकर्षक अश्रू पुसणारे तरुण) असे या योजनेचे नाव आहे. त्यांच्या देखण्या स्वरूपा व्यतिरिक्त, अश्रू पुसण्यात ते व्यावसायिक असणे आवश्यक आहे. अश्रूंमधून सांत्वन देणे, कामाच्या ठिकाणी भावनिक संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. अशा तरुणांना प्राधान्य दिले जाते. तरुणांमध्ये वाढत्या नैराश्या, कामाच्या ताणाला लक्षात घेऊन हिरोकी तेरई यांनी ही कल्पना मांडली होती. ती आता यशस्वी झाली आहे. जपानमध्ये बहुतेक कंपन्यांमध्ये तरुणींचेच वर्चस्व आहे. कमी पगारात जास्त काम करण्यात त्या निपुण आहेत. म्हणूनच सुंदर तरुणांची ही कल्पना केली असावी काय माहीत! 

तरुणांना शोधण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसून त्यांना सांत्वन देण्यात निपुण असलेल्यांनी येथे नोंदणी करावी. कोणत्याही गैरप्रकारांना येथे वाव नाही. मनातील दुःख अश्रूंमधून बाहेर काढल्यास अनेक धोके टाळता येतात, अश्रू अडवल्याने जीवाला धोका निर्माण होतो हे आधीच सिद्ध झाले आहे. म्हणूनच जपानमधील लोक घरीच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही अश्रू सोडावेत असे मला वाटते. अशा वेळी कोणी नसल्यास हे सुंदर तरुण अश्रू पुसण्यासाठी येतील हा यामागचा उद्देश आहे असे याचे रचनाकार हिरोकी तेरई म्हणतात. तरुणांची निवड प्रक्रियाही चालते. त्यासाठी मुलाखती इत्यादी असतात.