MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Good news: आता जीमेल आयडी देखील बदलता येणार, नेटिझन्ससाठी गुगलकडून आनंदाची बातमी

Good news: आता जीमेल आयडी देखील बदलता येणार, नेटिझन्ससाठी गुगलकडून आनंदाची बातमी

Good news : गुगल आता एक नवीन अपडेट आणत आहे. यामुळे युजर्सना नवीन अकाऊंट न बनवता आपला जीमेल युझरनेम बदलता येणार आहे. या बदलामुळे तुमच्या गुगल ड्राइव्ह, फोटोज यांसारख्या सेवांमधील डेटावर कोणताही परिणाम होणार नाही.

2 Min read
Marathi Desk 1
Published : Dec 27 2025, 03:50 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जीमेल युझरनेममध्ये बदल
Image Credit : Google

जीमेल युझरनेममध्ये बदल

अनेक वर्षांपासून जीमेल (Gmail) युजर्सना भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे. गुगल सध्या जीमेल युझरनेम बदलण्याची सुविधा प्रायोगिक तत्त्वावर विकसित करत आहे. यामुळे, नवीन गुगल अकाऊंट न बनवता, त्याच अकाऊंटवर नवीन जीमेल ॲड्रेस निवडता येईल. विशेषतः, लहानपणी तयार केलेला मेल आयडी आता बदलू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब आहे.

24
गुगल जीमेल अपडेट
Image Credit : Google

गुगल जीमेल अपडेट

हे नवीन अपडेट फक्त @gmail.com ने शेवट होणाऱ्या मेल ॲड्रेससाठी लागू होईल. एकाच गुगल अकाऊंटमध्ये, जुना जीमेल आयडी बदलून नवीन जीमेल युझरनेम निवडता येईल. या बदलामुळे Google Drive, Photos, YouTube, Play Store यांसारख्या सेवांमधील डेटा, खरेदी केलेली सबस्क्रिप्शन्स किंवा अकाऊंट हिस्ट्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. जुना मेल आयडी रिकव्हरी मेल म्हणून सेव्ह केला जाईल, त्यामुळे सुरक्षेची चिंता राहणार नाही.

Related Articles

Related image1
डोकं खाजवू नका.., आता कळणार रील व्हिडिओ खरा की खोटा?, फक्त गुगल जेमिनीला विचारा!
Related image2
मोबाइल रीचार्जसाठी गुगल पे आकारतेय सुविधा शुल्क?
34
कधी मिळणार सुविधा?
Image Credit : Google

कधी मिळणार सुविधा?

ही सुविधा सर्वांना एकाच वेळी मिळणार नाही. गुगल टप्प्याटप्प्याने हे फीचर आणत आहे. युजर्स गुगल अकाऊंच सेटिंग्जमध्ये 'Personal info' → 'Email' या विभागात जाऊन हे ऑप्शन उपलब्ध आहे की नाही, हे तपासू शकतात. एकदा बदल केल्यानंतर, जुन्या आणि नवीन दोन्ही जीमेल आयडीवर येणारे मेल एकाच इनबॉक्समध्ये मिळतील. तसेच, लॉग इन करताना दोन्ही मेल ॲड्रेस वापरता येतील.

44
गुगल अकाउंट अपडेट
Image Credit : Google

गुगल अकाउंट अपडेट

मात्र, यावर काही निर्बंधही आहेत. एकदा जीमेल युझरनेम बदलल्यानंतर, पुढील बदलासाठी 12 महिने थांबावे लागेल. या काळात, जुन्या आयडीवर परत जाण्याची सोय असेल. तसेच, तो जुना जीमेल आयडी वापरून नवीन गुगल अकाऊंट तयार करता येणार नाही. एका गुगल अकाऊंटमध्ये जास्तीत जास्त तीन वेळाच युझरनेम बदलता येईल. यामुळे, एकाच अकाऊंटवर कालांतराने चार जीमेल ॲड्रेस वापरण्याची संधी मिळेल.

About the Author

MD
Marathi Desk 1
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Year 2025: यंदा जगभरात सर्वाधिक विकले गेलेले टॉप 10 स्मार्टफोन कोणते यावर एक नजर
Recommended image2
Bangladesh Violence: 'अल्पसंख्याक हल्ल्यातील दोषींवर कारवाई करा' भारताकडून मागणी
Recommended image3
Cruelty of Soldier: रस्त्याच्या कडेला नमाज पढणाऱ्या तरुणाला गाडीखाली चिरडले
Recommended image4
टॉयलेटमध्ये धूम्रपान केल्यास काच होईल पारदर्शक, चीनने लढवली अनोखी शक्कल!
Recommended image5
कॅनडात भारतीय PhD च्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या, भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण!
Related Stories
Recommended image1
डोकं खाजवू नका.., आता कळणार रील व्हिडिओ खरा की खोटा?, फक्त गुगल जेमिनीला विचारा!
Recommended image2
मोबाइल रीचार्जसाठी गुगल पे आकारतेय सुविधा शुल्क?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved