MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • मिसाइल हल्ला झाल्यावर पायलट कसा वाचतो? काय आहे फायटर प्लेनमधलं हे तंत्रज्ञान?

मिसाइल हल्ला झाल्यावर पायलट कसा वाचतो? काय आहे फायटर प्लेनमधलं हे तंत्रज्ञान?

Fighter Jet Ejection Seats Explained : लढाऊ विमानात पायलटचा जीव वाचवणारी सर्वात महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा म्हणजे 'इजेक्शन सीट'. अपघात किंवा शत्रूच्या हल्ल्यावेळी ही खास सीट पायलटचा जीव वाचवते. चला, जाणून घेऊया ही सीट नक्की काम कशी करते.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Apr 05 2026, 05:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
लढाऊ विमानांमध्ये इजेक्शन सीटची भूमिका
Image Credit : Gemini AI

लढाऊ विमानांमध्ये इजेक्शन सीटची भूमिका

फायटर प्लेनमधील इजेक्शन सीट म्हणजे फक्त एक खुर्ची नाही, तर ते पायलटचं शेवटचं सुरक्षा कवच आहे. विमानात आग लागल्यास, इंजिन फेल झाल्यास किंवा मिसाइल हल्ला झाल्यास पायलट एक लिव्हर खेचतो. काही सेकंदातच संपूर्ण सिस्टीम कामाला लागते. आधी स्फोटकांच्या मदतीने विमानाचं कॉकपिट कव्हर (कॅनॉपी) उडवलं जातं. त्यानंतर सीटला जोडलेला रॉकेट मोटर पायलटला वेगाने वर ढकलतो. यावेळी पायलट विनाच्या अवशेषांना धडकू नये, यासाठी खास सेन्सर्स आणि कंट्रोल सिस्टीम काम करते. शेवटी योग्य उंचीवर पोहोचल्यावर पॅराशूट उघडतं आणि पायलटला जमिनीवर सुरक्षित उतरण्यास मदत करतं.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
इजेक्शन सीटमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान
Image Credit : X

इजेक्शन सीटमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान

इजेक्शन सीट साध्या तंत्रज्ञानाने बनत नाही. ही एक रॉकेटवर आधारित अत्यंत गुंतागुंतीची इंजिनिअरिंग सिस्टीम आहे. यात अनेक महत्त्वाचे भाग असतात. जसं की, रॉकेट मोटर किंवा कॅटपल्ट सिस्टीम, छोटे स्फोटक चार्ज, सेन्सर्स, ऑटोमॅटिक कंट्रोल सिस्टीम, पायलटच्या सुरक्षेसाठी खास हार्नेस आणि ऑटोमॅटिक पॅराशूट. हे तंत्रज्ञान अत्यंत अचूकपणे काम करणं गरजेचं असतं, कारण एक छोटीशी चूकही पायलटसाठी जीवघेणी ठरू शकते. म्हणूनच, ही सिस्टीम बनवण्याचं कौशल्य जगातल्या काही मोजक्या कंपन्यांकडेच आहे.

Related Articles

Related image1
One Gram Gold Locket: कमी बजेटमध्ये हवीये क्लासी स्टाईल? 1 ग्रॅम सोन्यात पाहा 7 सुंदर पेंडेंट-लॉकेट डिझाइन्स
Related image2
Car Market: 7 सीटर कार आली आता सामान्यांच्या बजेटमध्ये, किंमत फक्त ₹5.65 लाख
34
इजेक्शन सीटमध्ये जगात नंबर-१ कोण?
Image Credit : X

इजेक्शन सीटमध्ये जगात नंबर-१ कोण?

इजेक्शन सीट बनवण्यात ब्रिटनची 'मार्टिन-बेकर' (Martin-Baker) ही कंपनी जगभरात आघाडीवर आहे. या कंपनीला या क्षेत्रातील 'लीडर' मानलं जातं. भारताच्या 'तेजस' लढाऊ विमानापासून ते मिग आणि राफेलसारख्या अनेक विमानांमध्येही याच कंपनीने बनवलेल्या सीट्स वापरल्या जातात. या सीट्सनी आजपर्यंत हजारो पायलट्सचे प्राण वाचवले आहेत. मार्टिन-बेकरसोबतच रशियाची कंपनी 'NPP Zvezda' आणि अमेरिकेची 'कॉलिन्स एरोस्पेस' (Collins Aerospace) या कंपन्याही या क्षेत्रात काम करतात.
44
एका इजेक्शन सीटची किंमत किती?
Image Credit : X

एका इजेक्शन सीटची किंमत किती?

एका इजेक्शन सीटच्या निर्मितीचा खर्च खूप जास्त असतो. एका सीटची किंमत सुमारे १ कोटी ते ३ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. विमानाचा प्रकार आणि त्यात वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार ही किंमत बदलते. एका फायटर पायलटला तयार करण्यासाठी सरकारचा प्रचंड खर्च होतो. शिवाय, माणसाच्या जीवापुढे पैशांची किंमत कमीच असते, याच विचाराने सरकार इतका खर्च करायला मागेपुढे पाहत नाही.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जीवनशैली बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Europe Supermarket Hacking : युरोपमधील सुपरमार्केटचे फ्रीज कोण हॅक करतंय?
Recommended image2
Indian Navy Rescue : भारतीय नौदलाची कमाल! २० नागरिकांची केली सुटका, इराणने मानले आभार
Recommended image3
Disney Layoffs : डिझ्नीमध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर गदा
Recommended image4
Nepal Helicopter Crash : नेपाळमध्ये लँडिंग करताना दोन हेलिकॉप्टरची धडक, थरारक व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Viral Video: डेल्टा एअरलाइन्सच्या पायलटची भन्नाट अनाउन्समेंट, व्हिडिओ व्हायरल
Related Stories
Recommended image1
One Gram Gold Locket: कमी बजेटमध्ये हवीये क्लासी स्टाईल? 1 ग्रॅम सोन्यात पाहा 7 सुंदर पेंडेंट-लॉकेट डिझाइन्स
Recommended image2
Car Market: 7 सीटर कार आली आता सामान्यांच्या बजेटमध्ये, किंमत फक्त ₹5.65 लाख
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved