- Home
- World
- China Maglev Train : या ट्रेनने मुंबई ते पुणे केवळ १० मिनिटांत, चीनच्या या ट्रेनचे जगाला वावडे
China Maglev Train : या ट्रेनने मुंबई ते पुणे केवळ १० मिनिटांत, चीनच्या या ट्रेनचे जगाला वावडे
मुंबई - चीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत खूप प्रगती करत आहे. दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल करत आहे. चीनने आता आणखी एक चमत्कार केला आहे. ६०० किमी प्रतिसास धावणारी रेल्वे आणली आहे. या ट्रेनने तुम्ही मुंबई ते पुणे अंतर केवळ १० मिनिटांत पार करु शकता.

चीनने सादर केली 'माग्लेव्ह' रेल्वे
चीनने पुन्हा एकदा जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. हायस्पीड रेल्वे व्यवस्थेत आधीच आघाडीवर असलेल्या या देशाने आता ताशी ६०० किलोमीटर वेगाने धावणारी 'माग्लेव्ह' रेल्वे भव्यदिव्य स्वरूपात सादर केली आहे. १७ व्या आधुनिक रेल्वे प्रदर्शनात हा तांत्रिक चमत्कार लोकांसमोर आणण्यात आला.
७ सेकंदात ६०० किमी/तास वेग
जराही धक्के बसत नाहीत
जगातील सर्वात वेगवान रेल्वे
🇨🇳🚄China is redefining the world’s high-speed rail development.
The 600km/h driverless high-speed maglev train debuts! pic.twitter.com/1VghGaC1DQ— Shen Shiwei 沈诗伟 (@shen_shiwei) July 12, 2025
मुंबई-पुणे अंतर केवळ एका तासात
अशी सुपर स्पीड रेल्वे भारतात आली तर रेल्वे क्षेत्रात क्रांतिकारी बदल होतील. उदाहरणार्थ, मुंबई ते पुणे अंतर रस्त्याने गेलात तर १५२ किमी आहे. तर विमानाने गेलात तर ११८ किलोमीटर आहे. ही रेल्वे समृद्धी महामार्गासाराखी सरळ रेषेत धावली तर हे अंतर सुमारे १०० किलोमीटरच्या आसापास येईल. म्हणजेच या रेल्वेला मुंबईहून सुटल्यावर पुणे गाठायला केवळ १० मिनिटे लागतील.
सध्या भारतात पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे ही 'माग्लेव्ह' रेल्वे भारतात येण्यासाठी कमीत कमी पंचवीस वर्षे लागतील यात शंका नाही.
Ever wondered what 600 km/h feels like on the ground? 🚄
Hop on the world’s fastest train and get ready for an insane, mind-blowing ride.
This isn't sci-fi — it’s happening in China! 🇨🇳💨#FastestTrain#ChinaSpeed#Maglev#NextLevelTravel#FutureIsNow#HighSpeedRail#600kmh… pic.twitter.com/1Eq4Flm6U1— Chengdu China (@Chengdu_China) July 14, 2025

