MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Vietnam Travel Guide : आपले 100 रुपये इथे होतात 30000; भारतीयांसाठी सर्वात स्वस्त देश कोणता?

Vietnam Travel Guide : आपले 100 रुपये इथे होतात 30000; भारतीयांसाठी सर्वात स्वस्त देश कोणता?

भारतीय रुपयाच्या तुलनेत या देशाच्या चलनाचे मूल्य खूप कमी आहे. त्यामुळे योग्य प्लॅनिंग केल्यास तुम्ही कमी खर्चात राजासारखी ट्रिप करू शकता. आपले १०० रुपये तिथे ३०,००० रुपयांच्या बरोबरीचे होतात. हा देश कोणता, तिथला व्हिसा आणि प्रवासाची संपूर्ण माहिती….

4 Min read
Author : Karishma R
Published : Oct 26 2026, 11:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
बेस्ट टुरिस्ट स्पॉट
Image Credit : Asianet News

बेस्ट टुरिस्ट स्पॉट

परदेशवारी म्हटलं की लाखो रुपये खर्च होणार, असाच अनेकांचा समज असतो. विमान प्रवास, हॉटेल, जेवण आणि फिरणं या सगळ्याचं बजेट मोठं असतं. पण योग्य देशाची निवड आणि आधीच प्लॅनिंग केलं, तर कमी खर्चातही तुम्ही फॉरेन ट्रिप एन्जॉय करू शकता. व्हिएतनाम हा असाच एक बेस्ट टुरिस्ट स्पॉट आहे. निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, चविष्ट जेवण आणि वेगळ्या संस्कृतीमुळे हा देश पर्यटकांना आकर्षित करतोय. सध्या भारतीय पर्यटकांमध्ये व्हिएतनाम ट्रिपची भलतीच क्रेझ आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
28
'व्हिएतनामी डोंग'
Image Credit : Pinterest

'व्हिएतनामी डोंग'

या देशाबद्दल एक खूप रंजक गोष्ट आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत व्हिएतनामच्या चलनाचे मूल्य खूपच कमी आहे. आपले १०० रुपये म्हणजे व्हिएतनामचे 'व्हिएतनामी डोंग' (VND) ३०,००० च्या बरोबरीचे आहेत. चलनासोबतच तिथे हॉटेल, जेवण आणि फिरण्यासाठी किती खर्च येतो? ट्रिपला जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टी माहिती असायला हव्यात, याची संपूर्ण माहिती इथे दिली आहे.

Related Articles

Related image1
Top 10 Countries With Most Billionaires : जगात सर्वाधिक अब्जाधीश असणारे टॉप 10 देश, भारताचा नंबर कितवा?
38
दर करन्सी एक्सचेंज रेटनुसार बदलत असतो
Image Credit : Getty

दर करन्सी एक्सचेंज रेटनुसार बदलत असतो

व्हिएतनामच्या अधिकृत चलनाचे नाव 'व्हिएतनामी डोंग' आहे. जसा आपला रुपया INR आहे, तसा त्यांचा डोंग VND आहे. या देशात हजारो आणि लाखोंमध्ये किमती पाहून नवीन लोक थोडे शॉक होऊ शकतात.

व्हिएतनाममध्ये आपल्या १०० रुपयांना सुमारे ३०,००० डोंग आणि १,००० रुपयांना तब्बल ३ लाख डोंग मिळतात. पण हा दर करन्सी एक्सचेंज रेटनुसार बदलत असतो. बँक, एक्सचेंज सेंटर आणि कार्ड पेमेंटमध्ये दर वेगवेगळे असू शकतात. सोबतच एक्सचेंज फी देखील लागू शकते.

तिथे किमती मोठ्या आकड्यात दिसल्या तरी वस्तू महाग आहेत, असं समजू नका. डोंगचे मूल्य कमी असल्याने आकडे मोठे दिसतात. एखाद्या वस्तूची किंमत भारतीय रुपयात कन्व्हर्ट करून पाहिल्यावरच तुम्हाला खरा खर्च किती आहे, हे समजेल.

48
व्हिएतनाम खरंच स्वस्त देश आहे का?
Image Credit : Getty

व्हिएतनाम खरंच स्वस्त देश आहे का?

फक्त चलनाचे मूल्य पाहून एखादा देश स्वस्त आहे, असं ठरवता येत नाही. तिथले हॉटेलचे दर, जेवण, प्रवास, टुरिस्ट स्पॉट्सची एंट्री फी आणि पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधांच्या किमतीचाही विचार करावा लागतो.

व्हिएतनाममध्ये लोकल रेस्टॉरंटमध्ये जेवण, साध्या हॉटेलमध्ये मुक्काम आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यास खर्च आटोक्यात राहतो. विशेषतः आधीच हॉटेल बुक करणे, एकाच भागातील ठिकाणे एकाच दिवशी कव्हर करणे आणि टुरिस्ट सीझनमध्ये तिकीट आधीच काढल्यास पैसे वाचू शकतात.

पण जर तुम्ही लक्झरी रिसॉर्ट, प्रायव्हेट कॅब, महागडे रेस्टॉरंट आणि स्पेशल क्रूझ पॅकेज निवडले, तर बजेट नक्कीच वाढेल. त्यामुळे व्हिएतनाम ट्रिपचा खर्च तुमच्या प्रवासाची पद्धत, राहण्याचे ठिकाण आणि ट्रिपच्या दिवसांवर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं तर, व्हिएतनाम एकदम स्वस्तही नाही आणि खूप महागही नाही.

58
निसर्गसौंदर्यापासून ते ऐतिहासिक शहरांपर्यंत
Image Credit : Getty

निसर्गसौंदर्यापासून ते ऐतिहासिक शहरांपर्यंत

व्हिएतनाममध्ये निसर्गसौंदर्यापासून ते ऐतिहासिक शहरांपर्यंत पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पहिल्यांदा जाणाऱ्यांनी आपला वेळ आणि बजेटनुसार काही प्रमुख ठिकाणांची निवड करावी.

१. हा लाँग बे (Ha Long Bay)

हे व्हिएतनाममधील सर्वात प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट आहे. समुद्राच्या मधोमध उभे असलेले चुनखडीचे खडक, हिरवीगार बेटे आणि नैसर्गिक गुहा इथले मुख्य आकर्षण आहेत. निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर हा बेस्ट चॉईस आहे. इथे तुम्ही बोटिंग, क्रूझ टूर आणि गुहा पाहू शकता. तुम्ही निवडलेल्या पॅकेजवर इथला खर्च अवलंबून असतो.

२. हनोई (Hanoi)

व्हिएतनामची राजधानी हनोई तिच्या इतिहास, संस्कृती आणि लोकल लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. जुन्या शहराचे रस्ते, तलाव, पारंपारिक बाजार आणि ऐतिहासिक वास्तू तुम्ही इथे पाहू शकता. लोकल फूडची टेस्ट घ्यायची असेल, तर हे शहर एकदम भारी आहे. हो ची मिन्ह समाधी, होन कीम तलाव आणि ओल्ड क्वार्टर पर्यटकांना आकर्षित करतात.

३. हो ची मिन्ह सिटी (Ho Chi Minh City)

दक्षिण व्हिएतनाममधील हे शहर प्रमुख व्यावसायिक आणि पर्यटन केंद्र आहे. पूर्वी 'सायगॉन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहरात आधुनिक इमारतींसोबतच ऐतिहासिक वास्तूही आहेत. वॉर रेम्नंट्स म्युझियम, नोट्रे डॅम कॅथेड्रल, सेंट्रल पोस्ट ऑफिस आणि बेन थान मार्केट तुम्ही इथे पाहू शकता.

68
प्रेक्षणीय स्थळे
Image Credit : Getty

प्रेक्षणीय स्थळे

४. दा नांग (Da Nang)

समुद्रकिनारे, आधुनिक शहर आणि निसर्गाचा सुंदर संगम म्हणजे दा नांग. फॅमिली किंवा मित्रांसोबत ट्रिपला जाणारे लोक या शहराचा प्लॅन करू शकतात. माय खे बीच, मार्बल माउंटेन्स आणि बा ना हिल्स ही इथली प्रमुख आकर्षणे आहेत. बा ना हिल्समधील 'गोल्डन ब्रिज' त्याच्या वेगळ्या डिझाईनमुळे पर्यटकांना आकर्षित करतो.

५. होई अन (Hoi An)

पारंपारिक इमारती, रंगीबेरंगी कंदील आणि नदीकाठच्या सौंदर्यामुळे होई अन खूप खास वाटते. संध्याकाळी जुन्या शहराच्या रस्त्यांवरून चालणे आणि नदीत बोटिंग करणे पर्यटकांना एक वेगळाच फील देते. लोकल हस्तकलेच्या वस्तूंची दुकाने आणि पारंपारिक बाजार इथे पाहायला मिळतात. दा नांगवरून होई अनला तुम्ही बाय रोड जाऊ शकता.

78
सुंदर निसर्ग
Image Credit : Asianet News

सुंदर निसर्ग

६. निन्ह बिन्ह (Ninh Binh)

हिरवीगार भाताची शेते, चुनखडीचे डोंगर आणि नद्यांमुळे निन्ह बिन्ह परिसराला एक खास लूक मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात रिलॅक्स करायचे असेल, तर हा बेस्ट चॉईस आहे. ट्रँग अन आणि टॅम कॉकसारख्या ठिकाणी तुम्ही बोटिंग करू शकता. हनोईवरून निन्ह बिन्हला रस्ता किंवा ट्रेनने जाता येते.

७. फु क्वोक (Phu Quoc)

सुंदर समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि निळ्याशार पाण्यासाठी फु क्वोक बेट प्रसिद्ध आहे. फक्त रिलॅक्स करण्यासाठी फॉरेन ट्रिपला जाणारे लोक या ठिकाणाची निवड करू शकतात. बीचवर वेळ घालवणे, वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि निसर्गाचा आनंद घेणे ही इथली खासियत आहे.

88
व्हिएतनाम ट्रिप आरामदायी होण्यासाठी काही गोष्टी आधीच लक्षात ठेवा
Image Credit : Unsplash

व्हिएतनाम ट्रिप आरामदायी होण्यासाठी काही गोष्टी आधीच लक्षात ठेवा

व्हिसा: भारतीय पासपोर्ट धारकांनी ट्रिपपूर्वी व्हिएतनामच्या ई-व्हिसा नियमांची अधिकृत वेबसाईटवर माहिती घ्यावी.

करन्सी एक्सचेंज: भारतातून निघण्यापूर्वी किंवा तिथे पोहोचल्यावर खात्रीशीर ठिकाणाहूनच पैसे बदलून घ्या. एअरपोर्ट आणि शहरातील एक्सचेंज रेट वेगळे असू शकतात.

ट्रिप बुकिंग: फ्लाईट तिकीट, हॉटेल आणि क्रूझचे बुकिंग आधीच करून ठेवणे शहाणपणाचे ठरते. ऐनवेळी बुकिंग केल्यास खर्च वाढू शकतो.

हवामान: व्हिएतनामच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागात हवामान वेगवेगळे असते. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच प्लॅनिंग करा आणि कपडे सोबत ठेवा.

जेवण: व्हिएतनामी जेवणात नूडल्स, भात आणि नॉन-व्हेज जास्त असते. शाकाहारी लोकांनी हॉटेलमध्ये आधीच कल्पना देणे उत्तम. काही प्रमुख शहरांमध्ये इंडियन रेस्टॉरंट्सही उपलब्ध आहेत.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जागतिक बातम्या
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Israel Elections : इस्रायलमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप, नेतन्याहू आणि लष्करप्रमुखांमध्ये खडाजंगी
Recommended image2
Turkey Kitten Rescue: मांजराच्या पिल्लाला वाचवताना तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Recommended image3
Brazil Train Accident: ब्राझीलमध्ये रेल्वे रुळावर पडलेल्या क्रेनला ट्रेनची धडक, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Recommended image4
Live TV Broadcast: लाईव्ह रिपोर्टिंग करताना पत्रकाराला समुद्राच्या लाटेने उडवलं, पाहा थरारक व्हिडिओ
Recommended image5
Mountaineer Period Hack: १६,००० फुटांवर मासिक पाळी आली, गिर्यारोहक तरुणीने टिश्यू पेपरचा बनवला पॅड
Related Stories
Recommended image1
Top 10 Countries With Most Billionaires : जगात सर्वाधिक अब्जाधीश असणारे टॉप 10 देश, भारताचा नंबर कितवा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved