सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात बांगलादेशातील एका २० वर्षीय हिंदू तरुणीचं ६५ वर्षीय मुस्लिम व्यक्तीसोबत बळजबरीने लग्न लावून दिलं जात असल्याचा दावा केला जातोय. मात्र, या दाव्यांची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

बांगलादेश : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. बांगलादेशातील एका २० वर्षीय हिंदू तरुणीचं ६५ वर्षांच्या मुस्लिम व्यक्तीसोबत बळजबरीने लग्न लावून दिलं जात असल्याचा दावा यातून केला जातोय. या व्हिडीओमध्ये ती तरुणी ढसाढसा रडताना आणि स्वतःला वाचवण्यासाठी लोकांकडे भीक मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करून तरुणीला न्याय मिळावा, अशी मागणी सोशल मीडिया युजर्स करत आहेत.

View post on Instagram
 

Viral Video: 'माझ्या आईला सोडून द्या', चिमुकलीची माणसाकडे मन हेलावणारी याचना! (पाहा व्हिडीओ)

असं असलं तरी, या व्हिडीओसोबत केल्या जाणाऱ्या दाव्यांची अद्याप कोणतीही स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे शूट झाला, त्यात दिसणारे लोक कोण आहेत आणि या कथित लग्नामागचं सत्य काय आहे, हे अजूनही अस्पष्ट आहे. प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून या घटनेबाबत कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. त्यामुळे व्हिडीओसोबत जे दावे केले जात आहेत, ते १०० टक्के खरे आहेत की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही.

सध्या हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारखा पसरतोय आणि लोक त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी प्रशासनाला या व्हिडीओची सत्यता आणि त्यामागचा संदर्भ तपासावा लागेल. या कथित घटनेबाबत अधिक माहिती, जसं की त्या तरुणीची सध्याची अवस्था काय आहे आणि या प्रकरणी काही अधिकृत तपास सुरू झालाय का, याची अद्याप प्रतीक्षा आहे. जोपर्यंत पोलीस किंवा अधिकृत सूत्रांकडून या दाव्यांची पडताळणी होत नाही, तोपर्यंत हे आरोप केवळ दावेच राहतील.