Attacker Killed After Ramming Truck into Michigan Synagogue : अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एका ज्यू प्रार्थनास्थळावर हल्ला झाला आहे. एका हल्लेखोराने थेट इमारतीत ट्रक घुसवला, पण सुरक्षा रक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार केलं. या घटनेत इतर कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

Attacker Killed After Ramming Truck into Michigan Synagogue : अमेरिकेच्या मिशिगनमधील एका ज्यू प्रार्थनास्थळावर (सिनॅगॉग) मोठा हल्ला झाला आहे. एका हल्लेखोराने थेट इमारतीत गाडी घुसवली, ज्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला गोळ्या घालून ठार केलं. ही घटना गुरुवारी दुपारी डेट्रॉईट शहराजवळील 'टेम्पल ऑफ इस्रायल' नावाच्या सिनॅगॉगमध्ये घडली. सुदैवाने, या हल्ल्यात इतर कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हे एक मोठं प्रार्थनास्थळ असून त्याचे जवळपास १२,००० सदस्य आहेत. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा सिनॅगॉगच्या प्राथमिक शाळेत सुमारे १४० मुलं होती. FBI ने दिलेल्या माहितीनुसार, सर्वजण सुरक्षित आहेत. हा ज्यू समुदायाला लक्ष्य करून केलेला एक सुनियोजित हल्ला होता, असंही FBI ने स्पष्ट केलं आहे.

गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने इमारतीच्या पुढच्या दरवाजातून आपला ट्रक आत घुसवला. गाडीत तो एकटाच होता. प्राथमिक माहितीनुसार, ठार झालेला हल्लेखोर हा मूळचा लेबनॉनचा असून तो मिशिगनमध्ये राहत होता. हल्ल्यासाठी वापरलेला ट्रक त्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, बेरूतमध्ये इस्रायली हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला होता.

ओकलँड काउंटी पोलिसांनी सांगितलं की, हल्लेखोराने गाडी आत घुसवताच सुरक्षा रक्षकाने त्याला गोळ्या घालून रोखलं. या झटापटीत गाडीच्या धडकेने एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे. हल्लेखोराच्या गाडीची तपासणी केली असता, त्यात स्फोटकंही सापडली आहेत.