सार
१० वर्षांच्या मुलीच्या अखेरच्या इच्छेनुसार तिच्या पालकांनी तिचं लग्न लावून दिलं. काय आहे ही हृदयद्रावक कथा? वाचा सविस्तर...
अमेरिकेतल्या १० वर्षांच्या एका मुलीची ही दुःखद कथा. एम्मा एडवर्ड्स असं या चिमुकलीचं नाव. इतर मुलांसारखीच तिचेही अनेक स्वप्न होती. पण दुर्दैवाने तिला लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया हा प्राणघातक आजार झाला. डॉक्टरांनी सांगितलं की आता तिचे काही दिवसच उरले आहेत. हे ऐकून तिचे आईवडील अलीना आणि आरोन एडवर्ड्स हादरून गेले. त्यांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की आता काहीच करता येणार नाही.
आपल्या मुलीचे शेवटचे दिवस आनंदात जावेत म्हणून आईवडिलांनी तिची अखेरची इच्छा विचारली. मृत्यूबद्दल काही न सांगता त्यांनी तिला विचारलं, "काही इच्छा असेल तर सांग." तिने जे सांगितलं ते ऐकून सगळेच अवाक् झाले. तिला तिचा बालपणीचा मित्र डीजे उर्फ डॅनियल मार्शल क्रिस्टोफर विल्यम्स ज्युनियरशी लग्न करायचं होतं. तोही एक लहान मुलगा होता. दोघेही एकत्र शाळेत जात असत. तिने एकदा शाळेतच त्याच्याशी लग्न करायचा प्रयत्न केला होता हेही पालकांना कळालं. शेवटी तिच्या अखेरच्या इच्छेनुसार तिचं लग्न लावून देण्यात आलं. काही दिवसांनीच ती गेली.
ही घटना २०२२-२३ मध्ये घडली. एप्रिल २०२२ मध्ये एम्मा एडवर्ड्सला हा आजार असल्याचं निदान झालं. तिचे पालक तिच्या बऱ्या होण्याची आशा बाळगून होते. पण जून २०२३ मध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आता तिचा आजार बरा होणार नाही. मग तिची अखेरची इच्छा पूर्ण करण्यात आली. २९ जून रोजी १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न झालं. ११ जुलै २०२३ रोजी एम्माचं निधन झालं.
लग्न थाटामाटात झालं. एम्माचे वडील तिला तिच्या आजीच्या बागेत घेऊन गेले. तिथे तिचे शिक्षकही आले होते. दोन दिवसांचा विवाह सोहळा पार पडला. लग्नात दानधर्मही करण्यात आला. एका मित्राने कार्यक्रम सादर केला, तर दुसऱ्याने बायबलमधलं एक प्रकरण वाचलं. अशा प्रकारे मुलांनीच पुढाकार घेऊन लग्न पार पाडलं.