लहान मुले आणि  मोठ्यांनाही  आवडेल असा आरोग्यदारी आणि पाैष्टीक शेक घरीही बनवून शकता.  हा शेक बनवण्यासाठी प्रामुख्याने चार पदार्थ लागतात.अवघ्याही काही मिनिटांत तो तयार होऊ शकतो. 

 शेक हे साधारणपणे आरोग्यासाठी एक उत्तम पेय मानले जाते. आज बाजारात विविध चवींचे शेक उपलब्ध आहेत. लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही आवडेल असा एक पाैष्टीक शेक बनवूया. हा शेक बनवण्यासाठी प्रामुख्याने चार घटकांची आवश्यकता आहे. चला तर मग पाहूया हा शेक कसा बनवायचा? 

लागणारे साहित्य...

 केळे १ (चांगले पिकलेले)
ओट्स २ टेबलस्पून
खजूर ८
थंड दूध, आईस क्यूब्स (आवश्यक असल्यास)

बनवण्याची पद्धत...

सर्वप्रथम केळे, ओट्स (थोड्या दुधात शिजवून किंवा न शिजवता वापरू शकता), खजूर आणि थोडे दूध एकत्र करून मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या. नंतर गरजेनुसार घट्टपणासाठी दूध आणि आईस क्यूब्स घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आपला हेल्दी शेक तयार आहे...

केळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, सुक्रोज आणि फ्रक्टोज भरपूर प्रमाणात असते. केळे अनियंत्रित पेशींची वाढ रोखून रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि ट्यूमरच्या पेशींना वाढण्यापासून प्रतिबंधित करते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. केळ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पेशींची संख्या वाढण्यास मदत होते. 

याशिवाय, यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्यातील सोडिअमची पातळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. इतर फळांप्रमाणेच केळेदेखील शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचा एक समृद्ध स्रोत आहे. त्यात असलेले डोपामाइन आणि कॅटेचिन्स तुमचा मूड सुधारण्यास मदत करतात. ॲसिडिटी कमी करण्यासाठी केळे प्रभावी असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.