नवऱ्याला 'पाळीव उंदीर' म्हटल्याने घटस्फोट? छत्तीसगड हायकोर्टाचा निकाल
Wife and Husband Relationship: नवरा-बायकोचं नातं हे एकमेकांवरील प्रेम आणि आदरावर टिकून असतं. जेव्हा या गोष्टी नसतात, तेव्हा नात्यात दुरावा येतो. कायदाही हेच सांगतो. छत्तीसगड उच्च न्यायालयात आलेलं हे प्रकरणही असंच आहे.

अशा कारणावरूनही नवरा-बायकोला घटस्फोट मिळतो का?
छत्तीसगड हायकोर्टाने पतीच्या मानसिक छळाच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला. पत्नीला ५ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. पतीला 'पाळीव उंदीर' म्हणणे आणि हल्ला करणे हे छळ मानले गेले.
नेमकं प्रकरण काय आहे?
हे प्रकरण एका बँक कर्मचारी पती आणि शिक्षिका पत्नीचे आहे. पत्नी वेगळे राहण्यासाठी दबाव टाकत होती, मारहाण करायची आणि आई-वडिलांचे ऐकल्यामुळे 'पाळीव उंदीर' म्हणून अपमान करायची, असा आरोप पतीने केला.
अनेक वर्षांपासून पत्नी माहेरीच...
पतीच्या म्हणण्यानुसार, पत्नी २०१० मध्ये सणासाठी माहेरी गेली आणि परत आलीच नाही. मुलाच्या जन्मानंतरच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी पतीला बोलावले नाही किंवा माहितीही दिली नाही.
पत्नीचा युक्तिवाद काय आहे?
पत्नीने सर्व आरोप फेटाळले. पण 'आई-वडिलांना सोडल्याशिवाय घरी येऊ नका' असा मेसेज पतीला पाठवल्याचे तिने उलटतपासणीत कबूल केले. पती मानसिक छळ करायचा, असा आरोपही तिने केला.
फॅमिली कोर्ट आणि हायकोर्टाचा निकाल
फॅमिली कोर्टाने घटस्फोट मंजूर केला. हायकोर्टानेही हा निर्णय कायम ठेवला. पतीला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यास भाग पाडणे हा मानसिक छळ असल्याचं न्यायालयाने म्हटलं. यामुळे दोघे विभक्त झाले.

