VinFast India व्हिएतनामची इलेक्ट्रिक कार कंपनी विनफास्टने भारतीय बाजारात दमदार एंट्री केली आहे. फेब्रुवारी २०२६ च्या विक्री आकडेवारीनुसार, कंपनीने ह्युंदाई आणि BYD सारख्या मोठ्या कंपन्यांना मागे टाकत इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये चौथे स्थान मिळवले आहे.
VinFast India व्हिएतनामची इलेक्ट्रिक फोर-व्हीलर कंपनी विनफास्टने (VinFast) भारतीय बाजारात आपली जादू दाखवायला सुरुवात केली आहे. या कंपनीने गेल्या वर्षी, म्हणजे २०२५ च्या सणासुदीच्या काळात बाजारात प्रवेश केला होता. पण सुरुवातीपासूनच कंपनी जबरदस्त विक्री करत आहे. रिपोर्टनुसार, विनफास्टने सलग दुसऱ्या महिन्यात इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये ह्युंदाईला (Hyundai) मागे टाकले आहे. इतकंच नाही, तर ही कंपनी चीनच्या BYD पेक्षाही पुढे आहे. विक्रीचा आकडा कमी असला तरी, या सेगमेंटमध्ये चौथे स्थान मिळवणं हे विनफास्टसाठी मोठं यश मानलं जात आहे. फेब्रुवारी महिन्यात टाटा मोटर्स, एमजी मोटर्स आणि महिंद्रा यांच्यानंतर विनफास्ट चौथ्या क्रमांकावर होती.
इलेक्ट्रिक फोर-व्हीलरच्या विक्रीबद्दल बोलायचं झाल्यास, टाटा मोटर्सने (Tata Motors) फेब्रुवारी २०२६ मध्ये ५,५५८ गाड्या विकल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांनी ४,००२ गाड्या विकल्या होत्या. म्हणजेच, ३९% वाढ झाली. JSW MG मोटर इंडियाने फेब्रुवारी २०२६ मध्ये ३,३१० गाड्या विकल्या, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ३,४८९ गाड्या विकल्या होत्या. म्हणजेच विक्रीत ५% घट झाली. महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) फेब्रुवारी २०२६ मध्ये २,९१३ गाड्या विकल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा फक्त ५०८ होता. म्हणजेच, कंपनीने ४۷३% ची जबरदस्त वाढ नोंदवली. विनफास्ट इंडियाने (VinFast India) फेब्रुवारी २०२६ मध्ये ३८४ गाड्या विकल्या.
BYD इंडियाने फेब्रुवारी २०२६ मध्ये ३०६ गाड्या विकल्या, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये २७८ गाड्या विकल्या होत्या. यात १०% वाढ झाली. ह्युंदाई मोटर इंडियाने (Hyundai Motor India) फेब्रुवारी २०२६ मध्ये ३०४ गाड्या विकल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये विकलेल्या ७७५ गाड्यांच्या तुलनेत ही ६१% ची मोठी घट आहे. किया इंडियाने (Kia India) फेब्रुवारी २०२६ मध्ये २९५ गाड्या विकल्या, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये फक्त २२ गाड्या विकल्या होत्या. म्हणजेच, कंपनीने १२४१% ची प्रचंड वाढ केली. BMW इंडियाने फेब्रुवारी २०२६ मध्ये २४५ गाड्या विकल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये विकलेल्या २३९ गाड्यांच्या तुलनेत ही ३% वाढ आहे.
मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) फेब्रुवारी २०२६ मध्ये २१४ गाड्या विकल्या. मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) फेब्रुवारी २०२६ मध्ये ६५ गाड्या विकल्या, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ७२ गाड्या विकल्या होत्या. यात १०% घट झाली. टेस्ला इंडियाने (Tesla India) फेब्रुवारी २०२६ मध्ये २९ गाड्या विकल्या. व्होल्वो ऑटो इंडियाने (Volvo Auto India) फेब्रुवारी २०२६ मध्ये २५ गाड्या विकल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये विकलेल्या २४ गाड्यांच्या तुलनेत ही चार टक्के वाढ आहे. स्टेलँटिस इंडियाने (Stellantis India) फेब्रुवारी २०२६ मध्ये १३ गाड्या विकल्या, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये ६० गाड्या विकल्या होत्या. यात ७८ टक्के घट झाली.
पोर्शेने (Porsche) फेब्रुवारी २०२५ मध्ये ३ गाड्या विकल्या होत्या, तर फेब्रुवारी २०२६ मध्ये २ गाड्या विकल्या. म्हणजेच ५०% वाढ झाली. रोल्स रॉयसने (Rolls Royce) फेब्रुवारी २०२५ मध्ये विकलेल्या १ गाडीच्या तुलनेत ३ गाड्या विकल्या. म्हणजेच २००% वाढ झाली. JLR ने फेब्रुवारी २०२६ मध्ये २ गाड्या विकल्या. ऑडीने (Audi) फेब्रुवारी २०२५ मध्ये ७ गाड्या विकल्या होत्या. अशाप्रकारे, या सर्व कंपन्यांनी मिळून फेब्रुवारी २०२६ मध्ये १३,६६९ युनिट्सची विक्री केली, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये हा आकडा ९,४७९ युनिट्स होता. म्हणजेच, वार्षिक ४४% वाढ नोंदवली गेली.


