अवेळी जेवण, चुकीची जीवनशैली आणि ताणतणावामुळे अनेकजण मधुमेहग्रस्त झाले आहे. आहारात कोणताही बदल न करता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणाऱ्या एका उपायाबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत.
साखरेची अचानक होणारी वाढ (शुगर स्पाईक) केवळ एक दररोजच्या एका उपायामुळे टाळता येऊ शकते. या सहज व सोप्या सवयीमुळे इन्सुलिनची पातळी कमी होते, यकृतातील आणि पोटावरील चरबी घटते व शरीराला अधिक ऊर्जा मिळते. हा उपाय आहारात बदल न करताही फायदेशीर ठरतो. तो कोणता आहे, हे आता आपण जाणून घेऊया.
आजकाल मधुमेहाने ग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये 'द लॅन्सेट'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे २०% प्रौढ मधुमेहाने त्रस्त आहेत.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ योग्य आहारच नाही, तर जीवनशैलीतही काही बदल करणे आवश्यक आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी आहारात कोणताही बदल न करता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणाऱ्या एका उपायाबद्दल सांगितले आहे.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेवणानंतर १० मिनिटे चालणे. तुमच्या पायांचे स्नायू स्पंजप्रमाणे काम करतात. जेव्हा ते हालचाल करतात, तेव्हा ते थेट तुमच्या रक्तप्रवाहातून ग्लुकोज शोषून घेतात, असे डॉ. सौरभ सांगतात.
जेवणानंतर चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा मधुमेह आहे, त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे. जेवणानंतर चालल्याने ग्लुकोज रक्तात मिसळण्याचा वेग कमी होतो आणि शुगर स्पाईक (साखरेची अचानक वाढ) कमी होते.
रक्तातील ग्लुकोज कमी होणे म्हणजे इन्सुलिनचे उत्सर्जन कमी होणे. यामुळे यकृतामध्ये कमी चरबी जमा होते, ज्यामुळे फॅटी लिव्हर टाळण्यास मदत होते. जेवणानंतर १० मिनिटे चालण्याचे आरोग्य फायदे खालीलप्रमाणे आहेत.
रक्तातील साखरेची पातळी कमी होते
इन्सुलिनची पातळी कमी होते
यकृतामध्ये चरबीचा साठा कमी होतो
पोटावरील चरबी कमी होते
अधिक ऊर्जा मिळते


